Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

कै. एम. डी. चौगुले प्रतिष्ठानच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन

  बेळगाव : मण्णूर येथील कै. एम. डी. चौगुले सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेसाठी अनेक विधायक कार्य करणाऱ्या संघाच्या माध्यमातून सहकार्याच्या भावनेतून नेहमीच खारीचा वाटा उचलणाऱ्या प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हातभार लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगाव परिसरातील …

Read More »

कायदा-सुव्यवस्था राखणे प्रत्येकाचे कर्तव्य : एडिजीपी अलोक कुमार

  बेळगाव : सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत सीमाभागात कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राखण आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडिजीपी) अलोक कुमार यांनी केले. टिळकवाडी पोलीस ठाण्यात आज शुक्रवारी झालेल्या म. ए. …

Read More »

शेतकऱ्यांनी साजरा केला कृषी दिन

  बेळगाव : २३ डिसेंबर हा भूतपूर्व पंतप्रधान तसेच समस्त देशातील शेतकऱ्यांचे श्रध्दास्थान म्हणून प्रचलित असलेले चौधरी चरणसिंग यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय कृषी दिन म्हणून देशभर पाळला जातो. आज दर्श वेळा आमावस्या म्हणजे शेतकरी आपल्या शेतातील बहरलेल्या पिकांची पूजा करण्यासाठी गोड जेवण तयार करुन सहकुटूंब शेतात जाऊन पूजा करतात. हा …

Read More »

सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात द्वेषाचे राजकारण

  बेळगाव : भाजपा, आरएसएस नेहमीच देशभरात द्वेषाचे राजकारण करत आहे. मात्र यापुढे असे द्वेषमूलक राजकारण खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा मराठा समाजाच्या नेत्यांनी दिला आहे. बेळगाव केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी हे मराठा आणि हिंदू समाजाच्या विरोधात नाहीत. मात्र भाजप आणि आरएसएस हे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात …

Read More »

विधानसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

  बेळगाव : सुवर्णसौधमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात आज विधानसभेचे कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानंतर सोमवारी सकाळपर्यंत तहकूब करण्यात आले. पाच दिवसांचा आठवडा या हिशेबाने आज शुक्रवारी विधिमंडळ कामकाजाचा सप्ताह अखेरचा दिवस होता. आज सकाळी विधानसभेत नेहमीप्रमाणे प्रश्नोत्तराच्या तासात कामकाज चालले. अनेक महत्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा झाली. विशेष म्हणजे सप्ताह अखेरच्या दिवशी …

Read More »

सीमाबांधवांचा सच्चा कैवारी हरपला! ॲड. राम आपटे यांचे निधन

  बेळगाव : सीमाप्रश्न तज्ञ समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. राम महादेव आपटे (दादा) यांचे वयाच्या 97 व्या वर्षी राणी चन्नमा नगर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. १९२६ साली जन्मलेले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींचे अनुयायी बनून छोडो भारत चळवळीचे कार्यकर्ते बनलेले, पुढे सीमाप्रश्नाच्या कायदेशीर लढ्यात सक्रिय झालेले, …

Read More »

मधमाशांच्या हल्ल्यातील जखमीचा मृत्यू

  बेळगाव : मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 73 वर्षीय इसमाचा आज गुरुवारी दुपारी मृत्यू झाला आहे. भैरू गुंडू मोरे राहणार हलगा (तालुका-बेळगाव) असे मृत इसमाचे नाव आहे. शेत शिवार असणारे भैरू हे किराणा दुकानही चालवायचे. रविवारी पिक पाहण्यासाठी ते शिवाराकडे गेले होते. यावेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये ते जखमी …

Read More »

गुणात्मक होण्यापेक्षा ज्ञानात्मक होणे आज काळाची गरज : साहित्यिका कुमुद शहाकर

  व्याख्यान आणि आरोग्य शिबिराचे आयोजन संपन्न बेळगाव : जीवनात कीतीही संकटे आली तरी खचून न जाता त्यावर मात करण्यासाठी सामोरे गेले पाहिजे तरच घ्येय निश्चित गाठू शकतो हे आजचा पिढीनी आत्मसात करायला हवे. सखोल ज्ञान मिळवण्यासाठी अवांतर वाचनाची गोडी निर्माण करायला हवी. गुणात्मक होण्यापेक्षा ज्ञानात्मक होणे आज काळाची गरज …

Read More »

जीएसएस महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय संगणक कार्यशाळा संपन्न

  बेळगाव : टिळकवाडी येथील जीएसएस महाविद्यालयातील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांकरिता दोन दिवसीय संगणक विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जीएसएस महाविद्यालयाचे प्राचार्य प्रणव पित्रे हे होते. तर अंगडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट चे संगणक विभाग प्रमुख प्रा. सागर बिर्जे हे प्रमुख वक्ते होते. प्रारंभी जीएसएस महाविद्यालयाच्या …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीचे २६ डिसेंबर रोजी कोल्हापूरात धरणे आंदोलन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने दरवर्षी महामेळावा घेण्यात येतो. यंदा कर्नाटक प्रशासनाने पोलिसी दडपशाही वापरून महामेळावा रोखला. या अन्यायाच्या निषेधार्थ मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवार दि. २६ डिसेंबर रोजी कोल्हापूरात धरणे आंदोलन करण्याचा नारा दिला. यासंदर्भात आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कर्नाटक प्रशासनाने १९ …

Read More »