Saturday , November 7 2026
Breaking News

पायोनियर अर्बन बँकेकडे 126 कोटीच्या ठेवी जमा

Spread the love

 

बेळगाव : येथील दि बेळगाव पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतो गेल्या आर्थिक वर्षात ठेवी व कर्ज वाटपात वाढ झाली असून 31 मार्च अखेर बँकेने 127.48 कोटीच्या ठेवी जमा केल्या आहेत. बँकेला पहिल्यांदाच एक कोटी 55 लाख रुपयाचा नफा झाला आहे .”अशी माहिती बँकेचे चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर यांनी बोलताना दिली एक एप्रिल रोजी बँकेचे सर्व संचालक आणि कर्मचारी अशा सर्वांची एक बैठक संपन्न झाली. त्याप्रसंगी श्री अष्टेकर यांनी वरील प्रमाणे माहिती दिली “बँकेने 95 कोटी रुपयांची कर्जे वितरित केली असून बँकेचा एनपीए शून्य टक्के आहे. बँकेच्या आतापर्यंतच्या 117 वर्षाच्या कारकिर्दीत प्रथमच ही उल्लेखनीय प्रगती झाली आहे” अशी माहितीही त्यांनी दिली. या प्रगतीचा आनंद केक कापून साजरा करण्यात आला. याप्रसंगी बँकेच्या सीईओ सौ अनिता मूल्या यांनी बँकेने घेतलेल्या विविध योजनांची माहिती दिली आणि बँकिंग क्षेत्रात होत असलेले बदल लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी अधिक कार्यतत्पर राहण्याची व ग्राहकाभिमुख सेवा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. बँकेचा ग्राहक हा एक महत्त्वाचा घटक असून ग्राहकांना उत्तम सेवा दिली जावी” असे त्या म्हणाल्या. “याही पुढे बँकेच्या प्रगतीचा चढता आलेख राहील” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात बँकेच्या दोन शाखा काढल्या जाणार असल्याची माहिती चेअरमन श्री. अष्टेकर यांनी दिली.
याप्रसंगी संचालक अनंत लाड, शिवराज पाटील यांचीही चेअरमन आणि कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करणारी भाषणे झाली.
या प्रसंगी बँकेचे व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण पाटील तसेच सर्व संचालक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

सुभाष अडूरकर यांचा निरोप समारंभ
बँकेच्या विविध शाखात 30 वर्षाहून अधिक काळ सेवा बजावून 31 मार्च रोजी निवृत्त झालेले कर्मचारी श्री. सुभाष अडूरकर यांचा चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि त्यांना दीर्घायुष्य चिन्तिण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *