Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

यात्रा काळात सोयी सुविधा उपलब्ध करून द्या

  कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे प्रशासनाला साकडे बेळगाव : पुढील महिन्यात पाच ते सात डिसेंबर दरम्यान सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीचे यात्रा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा काळात मोठ्या संख्येने येणाऱ्या सोयी सुविधांची दखल घेत प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या वतीने …

Read More »

रिंगरोड विरोधी मोर्चासंदर्भात म. ए. समितीचे पोलीस आयुक्तांना निवेदन

  बेळगाव : बेळगाव तालुक्याच्या ३४ गावातील शेकडो एकर सुपीक जमीन संपादित करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा रिंग रोड प्रकल्प रद्द करा अन्यथा सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देत महाराष्ट्र एकीकरण समितीने येत्या 28 नोव्हेंबरला बेळगावात मोर्चाचे आयोजन केले आहे. रिंगरोडसाठी जमीन संपादित करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग मंडळाने एका इंग्रजी …

Read More »

“त्या” वायरल फोटोचे गौडबंगाल काय?

  बेळगाव : विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे बेळगावातील राजकारण रंगू लागले आहे. प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणून ओळखले जाणारे रमाकांत कोंडुसकर समितीच्या संपर्कात येताच राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. रमाकांत कोंडुसकर हे जनतेतील नेते म्हणून ओळखले जातात. रस्त्यावरील त्यांची ताकद प्रचंड आहे. रमाकांत हे …

Read More »

पंडित नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थीनीची राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : कोलार येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत पंडित नेहरू हायस्कूलची इयत्ता 9 ची विद्यार्थीनी कु. ऐश्वर्या गोल्लार हिने 82 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला तसेच कु. कार्तिक पावसकर याने 55 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळविला. आता ऐश्वर्या गोल्ल्यार हिची निवड दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेसाठी …

Read More »

सुभाषचंद्रनगर समुदाय भवनाचा वर्धापन दिन उत्साहात

  बेळगाव : शहरातील सुभाषचंद्रनगर येथील सुभाषचंद्रनगर नागरिक संघटनेने बांधलेल्या समुदाय भवनाचा 11 वा वर्धापन दिन भरगच्च कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समुदाय भवन सभागृहात आयोजित वर्धापन दिन सोहळ्याच्या प्रारंभी राधिका तेंडुलकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपाध्यक्ष चंद्रशेखर …

Read More »

बालदिनानिमित्त ‘एंजल’तर्फे शाळांमध्ये मिठाई -खाऊचे वाटप

  बेळगाव : शहरातील एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांच्या नेतृत्वाखाली बाल दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध शाळांमधील मुलांना मिठाई व खाऊचे वाटप करण्यात आले. एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघातील सरकारी कन्नड व मराठी शाळांना मिठाईचे वाटप केले. त्याचप्रमाणे त्यांनी फुलबाग गल्ली येथील शाळा नंबर 7, …

Read More »

बेनकनहळ्ळीत रस्ते बांधकामाचा शुभारंभ

  आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या बेनकनहळ्ळी गावातील रस्त्यांच्या विकासासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आमदार निधीतून 45 लाख रु. अनुदान मंजूर केले आहे. आज महालक्ष्मी नगर, बेनकनहळ्ळी येथे स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत भूमिपूजन करून रस्त्याच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी आ. लक्ष्मी हेब्बाळकर …

Read More »

ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या वतीने आरोग्य तपासणी

  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्याकाळी सेवा केंद्र यांच्यामार्फत विविध गुणदर्शनच्या कार्यक्रम डॉक्टर नीता देशपांडे यांच्या डायबिटीस क्लिनिकमध्ये शनिवारी संपन्न झाला. प्रारंभी रवींद्रनाथ जुवळी यांनी गीत सादर केले. त्यानंतर डॉक्टर सुचिता हवालदार यांनी दातांची निगा कशा प्रकारे ज्येष्ठांनी ठेवावी. याची सविस्तर माहिती दिली. तसेच दात खराब होण्याचे …

Read More »

राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे 4 डिसेंबर रोजी भव्य मॅरोथॉन

  बेळगाव : कावळेवाडी…(बेळगाव) राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे 4 डिसेंबर 22 रोजी भव्य मॅरोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा तीनगटात घेण्यात येतील. पुरुष खुलागट, महिला खुलागट व चौदा वर्षेखालील कुमार-कुमारीकासाठी बक्षिसे-ओपन पुरुष गट..प्रथम 3001/-, द्वितीय 2500/-, तृतीय 2000/- चौथा 1500/-, पाचवा 1000/- महिला ओपनगट पहिले 2001/-, द्वितीय …

Read More »

हिंडलगा येथे दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव : हिंडलगा येथील महालक्ष्मी देवी यात्रा उत्सव संघाच्या वतीने कनकदास जयंतीनिमित्त दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शंभर वर्षानंतर भरविण्यात आलेल्या यात्रेनिमित्त यावर्षीचा दुसरा दीपोत्सव दि. 11 रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यात्रा कमिटीचे अध्यक्ष कृष्णा पावशे व मार्गदर्शक रमाकांत पावशे उपस्थित होते. दीपोत्सव उद्घाटक गायत्री ज्युलर्सचे …

Read More »