Monday , September 21 2026
Breaking News

दि. तालुका रुरल इंडस्ट्रीयल को-ऑप. सोसायटीचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आज

Spread the love

 

महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील यांची उपस्थिती

बेळगाव : दि. तालुका रुरल इंडस्ट्रीयल को-ऑप. सोसायटीचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आज रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजता गोवावेस येथील रेल्वे ओव्हर ब्रिजनजीकच्या मराठा मंदिर येथे साजरा केला जात आहे, अशी माहिती चेअरमन रमेश वामनराव मोदगेकर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री जयंतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाला लाभणार असून महाराष्ट्र राज्याचे निवृत्त पणन संचालक व अतिरिक्त आयुक्त दिनेश ओऊळकर, सहकारी संघाचे संयुक्त निबंधक जी. एम. पाटील, उपनिबंधक एम. एन. मणी, साहाय्यक निबंधक रविंद्र पाटील तर प्रमुख वक्ते म्हणून गडहिंग्लजचे प्रा. डॉ. दत्ता पाटील व प्रा. आनंद मेणसे आदी मान्यवरही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, असे व्हाईस चेअरमन रघुनाथ पाटील यांनी सांगितले आहे.

सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ सभासदांचा, सोसायटीच्या माजी कर्मचाऱ्यांचा, गुणीजनांचा सन्मान केला जाणार आहे. याशिवाय इतर काही कार्यक्रम राबविले जाणार आहेत, असे सर व्यवस्थापक जयवंत लक्ष्मण खन्नूकर यांनी सांगितले आहे.

सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेअरमन रमेश वामनराव मोदगेकर, व्हाईस चेअरमन रघुनाथ पाटील यासह मिलिंद पावशे, मारुतीराव सदावर, कृष्णराव मोदगेकर, यल्लाप्पा चौगुले, उदय किल्लेकर, शिवाजी शहापूरकर, सौ. नंदा बिर्जे व श्रीमती निर्मला कामुले हे संचालक आणि सर व्यवस्थापक जयवंत खन्नूकर तसेच कर्मचारी व पिग्मी कलेक्टर विशेष परिश्रम घेत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *