Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

कोविड दरम्यान अनावश्यक चर्चा करु नका : उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी

बेळगाव : मुख्यमंत्री बदलाविषयी घाईगडबड करीत असलेल्या भाजप नेत्यांना परिवहन मंत्री आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.अथणी तालुक्यातील विविध ठिकाणी कालव्यांमध्ये पाणी पुरवठा करण्याच्या कामकाजाचा शुभारंभ केल्यानंतर उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी पत्रकारांशी बोलत होते. सध्याच्या काळात कोविडची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. आशा वेळी व्यर्थ चर्चा करण्यात अर्थ नाही …

Read More »

३५ जंबो ऑक्सिजन सिलिंडर्सचे ‘बिम्स’ला हस्तांतरण

बेळगाव : बेळगावात ऑक्सिजनची टंचाई लक्षात घेऊन काही स्वयंसेवी संस्थांनी ३५ जंबो ऑक्सिजन सिलिंडर्स दान केले आहेत. आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत गुरुवारी ते ‘बिम्स‘ला हस्तांतरित करण्यात आले. याचवेळी १० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स महानगरपालिका आणि जनसेवा केंद्रांना देण्यात आले.बेळगावात कोरोना रुग्णांच्या उपचारांत ऑक्सिजनची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ती …

Read More »

म. ए. युवा समितीच्यावतीने विविध संघटनांच्या कोविड योद्ध्याना पीपीई किट भेट

बेळगाव : कोरोनाच्या या भयंकर परिस्थितीमध्ये बेळगावमधील विविध संघटना प्रशासनाची कोणतीही मदत नसताना उल्लेखनीय कार्य करत आहेत, लोकांचे जीव वाचवायचे असोत किंवा मृत रुग्णांचा सन्मानाने अंत्यविधी असो सर्व कोरोना योद्धे दिवसरात्र झटत आहेत. अश्याच कोविड योद्ध्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पीपीई किट देण्यात आले. श्रीराम सेना हिंदुस्थानचे सचिन चव्हाण, …

Read More »

पिग्मी कलेक्टरनाही आर्थिक मदत करा: जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

निवेदन देताना बेळगाव- कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे कर्नाटक सरकारने संकटात सापडलेल्या गरीब व श्रमिकांना 1250 कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. मात्र या पॅकेजमध्ये पिग्मी कलेक्टर्सचा समावेश नाही. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद असल्याने अर्थिक संस्थांची पिग्मी कलेक्‍शन ही बंद आहे. पिग्मी कलेक्टर्सना त्यांच्या कलेक्शनवरच संस्थाकडून कमिशन दिले जाते पण कलेक्शन्स …

Read More »

कर्नाटक: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘आकांक्षा’ पोर्टलचे अनावरण

बेंगळूर : कर्नाटकच्या ग्रामीण भागात कोरोनाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी बुधवारी सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवडक ग्रामपंचायतींसह अधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. यांनतर कोरोना संकटात योगदान देऊ इच्छिणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा सहभाग अधिक सोपा व्हावा यासाठी नियोजन खात्याने ‘आकांक्षा’ पोर्टल सुरु केले आहे. बुधवारी मुख्यमंत्री बी. …

Read More »

सुरु केली विनामूल्य रुग्णवाहिका सेवा

बेंगळूर : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बऱ्याच वेळेला रुग्णांना रुग्णालयात नेताना रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, बुधवारी कर्नाटक काँग्रेसच्या वतीने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मोफत रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आली आहे. कर्नाटक युवा कॉंग्रेस कमिटीच्या पुढाकाराने काँग्रेसने कोडगू, शिमोगा आणि चिकमंगळूर येथील नागरिकांसाठी कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे …

Read More »

कृषी सुधारणा कायद्यांविरोधात बेळगावात शेतकऱ्यांकडून काळा दिन

बेळगाव : केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला आज सहा महिने पूर्ण झाले. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत बेळगावातही या कायद्यांविरोधात काळा दिन पाळण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकावत आंदोलन केले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्याहीताच्या आड येणारे कृषी सुधारणा …

Read More »

बंद असलेली प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करा : खानापूर युवा समिती

बेळगाव : खानापूर तालुक्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असून ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन कापोली, माचीगड व माणिकवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे तहसीलदार रेश्मा …

Read More »

फुल उत्पादक-व्यापारी संकटात : उद्यापासून मार्केट बंद

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारनेजारी केलेल्या लॉकडाउनमुळे बेळगावात फुलउत्पादकांना व विक्रेत्यांना मोठ्या नुकसानीला सामोरेजावे लागत आहे. विक्रीस आणलेली फुले रस्त्यावरओतून देऊन रिकाम्या हाती घरी परतण्याची वेळत्यांच्यावर आली आहे. व्यापार नसल्याने उद्यापासूनफुल मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे बेळगाव होलसेल फुलमार्केट ओस पडले आहे. बाजारात आणलेली फुले ग्राहकांअभावी तशीच पडून रहात असल्याने शेतकरी आणि विक्रेत्यांनाही नुकसान सोसावे लागत आहे. लॉकडाउनमुळे लग्नसोहळे व अन्य समारंभांना बंदी आहे तर देव गाभाऱ्यात अन मंदिरे बंद अशी स्थिती आहे. त्यामुळे फुलांना मागणी नाही. परिणामी फुल उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना संकटात …

Read More »

श्री महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन

खानापूर : श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक श्री. विठ्ठल हलगेकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महालक्ष्मी सौंसर्गिक रोग व आपत्ती निवारण समितीच्या वतीने शांतिनिकेतनमध्ये कोरोना केअर सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन सोमवार दिनांक २४ मे रोजी अवरोली माठादिष श्री चन्नबसव देवरू व रामदासजी महाराज तोपिनकट्टी यांच्या सानिध्यात झाले. अध्यक्षस्थानी विठ्ठल …

Read More »