Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगाव

यशस्वी उद्योजक होण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक : राजीव दोड्डन्नवर

  बेळगाव : जीवनात यशस्वी उद्योजक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम केले पाहिजेत. त्यांनी सतत बदलत्या बाजारपेठेचा अभ्यास केला पाहिजे, असे मत भारतेश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राजीव दोड्डन्नवर यांनी व्यक्त केले. नुकतेच भारतेश एज्युकेशन ट्रस्टच्या ग्लोबल बिझनेस स्कूलने M.B.A. 2020-2022 च्या तुकडीच्या विद्यार्थ्यांच्या पदवी दिन आणि समापन समारंभाचे उद्घाटन करताना ते …

Read More »

तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी

  दक्षिण विभाग काँग्रेसच्यावतीने जोरदार निदर्शने बेळगाव : टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट येथील उड्डाणपुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी दक्षिण विभाग काँग्रेसच्यावतीने मंगळवारी सकाळी “त्या” उड्डाणपलावर मोर्चा काढून जोरदार आंदोलन छेडण्यात आले. आमदार माजी आमदार रमेश कुडची यांच्या नेतृत्वाखाली शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी तिसऱ्या रेल्वे गेट येथील नव्या उड्डाण …

Read More »

बेळगाव येथील चोरी प्रकरणी राजस्थानमधून तीन आरोपींना अटक

  बेळगाव : शहरातील मार्केट पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बागवान गल्ली येथील एका दुकानातील चोरीप्रकरणी पोलिसांनी राजस्थानमधून तीन आरोपींना अटक केली. 13 ऑक्टोबर रोजी सदरुद्दीन चौधरी यांच्या दुकानातून 4 लाख रोख रक्कम चोरीला गेली. याप्रकरणी सदरुद्दीन यांनी मार्केट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि राजस्थान पोलिसांच्या …

Read More »

50 हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक; लोकायुक्त पोलिसांची कारवाई

बेळगाव : बेळगावच्या जिल्हा उद्योग केंद्राचे संचालक आणि सहाय्यक संचालकांना सबसिडी मंजुरीचे पत्र देण्यासाठी 50 हजारांची लाच घेताना लोकायुक्त पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. सहसंचालक आर. एच. शिवपुत्रप्पा आणि सहाय्यक संचालक पद्मकांत जी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत लोकायुक्त पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा उद्योग केंद्राच्या एका योजनेचे लाभार्थी …

Read More »

समस्या सोडविल्या नाहीत तर ग्राम पंचायतीला टाळे ठोकण्याचा कडोली ग्रामस्थांचा इशारा

  बेळगाव : कडोली येथील वैजनाथ गल्ली अनेक वर्षांपासून रस्ता, गटारी, पिण्याचे पाणी, पथदीप अश्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. तसेच जलजीवन पिण्याच्या पाण्यासाठी रस्ता खोदून जलवाहिनी घातल्यामुळे समस्येत आणखीनच भर पडली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. वैजनाथ …

Read More »

खर्गे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष आणखी उंचावणार : आमदार हेब्बाळकर, हट्टीहोळी

  बेंगळुरू: बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी कर्नाटकचे ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची एआयसीसीच्या नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. खर्गे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्ष आणखीन उंचावर जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मल्लिकार्जुन खर्गे यांची एआयसीसी अध्यक्षपदी …

Read More »

लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडीच्या विविध स्पर्धा उत्साहात संपन्न

  बेळगाव : लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडी यांच्या वतीने दीपावली निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांकरिता घेण्यात आल्या होत्या. यामध्ये लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, बेडूक उडी, लिंबू चमचा, पोटॅटो रस या स्पर्धा घेण्यात आल्या आणि महिलांकरिता बॉटल स्पून, गोळा फेक, पोटॅटो रेस, …

Read More »

येळ्ळूर येथील विद्यार्थी अपघातात जखमी; प्रशासनाचे रस्त्यांसंदर्भात दुर्लक्ष

  बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतकडून जिल्हाधिकारी यांना येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्यांनी व सर्व शाळांच्या शिक्षकानी विविध मागण्यांसाठी निवेदन दिले होते. निवेदनात म्हटले होते की येळ्ळूर हद्दीत येणाऱ्या सर्व शाळा जवळील मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे व सिग्नल बोर्ड बसविणे आणि नंदीहळ्ळी, देसुर, आणि गर्लगुंजी येथून येणारी विटा, वाळूची वाहने …

Read More »

विद्यार्थी सतत अध्ययनशील असले पाहिजेत : प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर

  बेळगाव : येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृह विज्ञान महाविद्यालयात नवीन वर्षात प्रवेश घेतलेल्या बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात बी.कॉम. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवनाने झाली. तद नंतर …

Read More »

गोमातेच्या संरक्षणासाठी काकतीत रुद्राभिषेक

बेळगाव : लंपी स्कीन या त्वचारोगापासून आपल्या जनावरांचे विशेषतः गोमातेचे रक्षण व्हावे या सदुद्देशाने काकती येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान (ग्राम दैवत) येथे रुद्राभिषेक करण्यात आला. शेतकऱ्यांच्या गाई लंपीपासून सुरक्षित रहाव्यात यासाठी काकती गावच्या समस्त ग्रामस्थांच्यावतीने काल सोमवारी हा अभिषेक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. वे. शा. स. राचय्या शिवपूजीमठ व उदय …

Read More »