Monday , December 15 2025
Breaking News

बेळगाव

येळ्ळूर ग्रामदेवता चांगळेश्वरी देवीचा अभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

  बेळगाव : मंगळवार दि. 09/08/2022 रोजी येळ्ळूर ग्रामदेवता चांगळेश्वरी देवीचा अभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. 2001 साली श्री चांगळेश्वरी अभिषेक उत्सव मंडळ चांगळेश्वरी गल्ली येळ्ळूरची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून आतापर्यंत जवळजवळ 21 वर्षे हा अभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे. कोरोनामुळे गेली 2 वर्षे अगदी साध्या पद्धतीने …

Read More »

निधी करबरकरला राणी चन्नम्मा विश्वविद्यालयात प्रथम क्रमांकासह गोल्ड मेडल

  बेळगाव : बसवाण गल्ली होसुर येथे राहणाऱ्या निधी कणबरकर हिला एम. कॉम. परीक्षेत राणी चन्नम्मा विश्वविद्यालयात प्रथम क्रमांकासह गोल्ड मेडल मिळाले आहे. या यशामुळे तिंचे सर्वत्र कौतुक होत आहे. एम. कॉम. प्रथम वर्षात देखील तिने प्रथम क्रमांक मिळवला होता. निधी ही सुरुवाती पासूनच हुशार विद्यार्थिनी आहे. गोगटे कॉलेज ऑफ …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतीकडून केएसआरटीला निवेदन

  बेळगाव : येळ्ळूर गाव हे तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळखले जाते पण येळ्ळूरमध्ये रात्रीची वस्तीसाठी एकही बस नाही. ज्या बसेस चालू आहेत त्या वेळेवर येत नाहीत आणि जास्तीत जास्त बस ह्या मिनी बस आहेत. त्यामुळे बसमध्ये प्रचंड गर्दी होते. गर्दीमुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये उभं राहायला ही जागा नसते. अशात काही …

Read More »

मराठा मंदिरात भव्य शॉपिंग उत्सव 60 हून अधिक स्टाॅल्सचा सहभाग

  बेळगाव : भारतीय ट्रेडर्स आणि यश कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश चतुर्थी निमित्त 6 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान शॉपिंग उत्सव- कंजूमर प्रदर्शनाचे 10 दिवस आयोजन करण्यात आले आहे. मराठा मंदिराच्या भव्य सभागृहात होणाऱ्या या प्रदर्शनात 60 हुन अधिक कंपन्याने सहभाग घेतला आहे. त्यामध्ये अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे ब्रँडेड गारमेंट्स …

Read More »

साचलेल्या पाण्यात जिल्हाधिकारी फिरले अनवाणी पायांनी!

  २४ तासांत मदतीची कार्यवाही : जिल्हाधिकारी नितेश पाटील बेळगाव : काल रात्रीपासून आज दिवसभरात बेळगाव शहर आणि परिसरात पावसाने जोर धरला आहे. रात्रीच्या पावसामुळे शहर आणि उपनगर भागातील अनेक नागरिक वसाहतींमध्ये घराघरात पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी घरे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पाणी …

Read More »

स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आमदार अनिल बेनके यांच्या कार्यालयात तिरंगा ध्वज वाटप

  बेळगांव : दिनांक 08 ऑगस्ट 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांच्या कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात आयोजित करण्यात येणार्‍या हर घर तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून महाशक्ती प्रमुख व नगरसेवकांना तिरंगा ध्वज देण्यात आला. यावेळी बेळगांव उत्तर मंडळाचे अध्यक्ष श्री. विजय कोडगनूर व सरचिटणीस श्री. विनोद लंगोटी, …

Read More »

आमदार अनिल बेनके यांच्याकडून श्रीनगर नाला व किल्ला तलावाची पाहणी

  बेळगांव : दिनांक 08 ऑगस्ट 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी श्रीनगर नाला व किल्ला तलावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदार अनिल बेनके यांनी श्रीनगर येथील नाल्यांची चोकअप साफ करण्याच्या आणि सुरळीत पाण्याच्या प्रवाहासाठी राष्ट्रीय ध्वजाजवळील किल्ला तलाव स्वच्छ करा, अशा संबंधित अधिकार्‍यांना सुचना दिल्या.

Read More »

सार्वजनिक वाचनालयाचा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार साहित्यिक महादेव मोरे यांना जाहीर

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठेचा ‘आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार-2022’ साहित्यिक श्री. महादेव मोरे (निपाणी) यांना जाहीर करण्यात येत आहे. या पुरस्काराचे स्वरुप रुपये पंचवीस हजार, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे. याआधी ‘पानीपत’कार विश्वास पाटील (मुंबई), श्री. अरुण साधू (मुंबई), डॉ. जयसिंगराव पवार …

Read More »

मुसळधार पावसातही म. ए. समितीची निदर्शने

  बेळगाव : मराठी भाषिकांना कायद्यानुसार मराठी भाषेतच सरकारी कागदपत्रे देण्याच्या मागणीसाठी मुसळधार पावसातही शेकडोंच्या संख्येने जमलेल्या मराठी भाषिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. पावसाच्या अस्मानी संकटाला तोंड देत न्याय्य हक्कांसाठी लढण्याचा वज्रनिर्धार पुन्हा एकदा दाखवून दिला. सीमाभागातील मराठी भाषिकांना सरकारी कागदपत्रे मराठीत देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश असताना आणि …

Read More »

बेळवट्टी येथील प्राथमिक शाळेची संरक्षण भिंत कोसळून नुकसान

  बेळगाव : बेळवट्टी भागात सततचा मुसळधार पाऊस पडत असल्याने सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेची संरक्षण भिंत (कंपाऊंड) काल दि. 7 ऑगस्ट रोजी कोसळली. भिंत कोसळून आर्थिक नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती बीआरसी, गट शिक्षणाधिकार्‍यांना दिली आहे. तरी याची पाहणी करून शिक्षण खात्याने संरक्षण भिंतीसाठी अनुदान लवकरात लवकर मंजूर …

Read More »