बेळगाव : शास्त्रीनगर येथील दि आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञानमंदिर इंग्लिश मीडियम शाळेमध्ये आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील विविध स्पर्धांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अलका जाधव यांनी प्रास्ताविक करून मुलांना प्रोत्साहन पर स्वागत पर भाषण …
Read More »भारतनगर, अनगोळ येथे घरे कोसळली
बेळगाव : बेळगावात गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तशातच घरे कोसळण्याचे सत्र पुन्हा सुरु झाले आहे. भारतनगर तसेच अनगोळ येथील वाडा कंपाऊंड येथील एक दुमजली घर आज सकाळी कोसळल्याची घटना घडली. गेल्या बेळगाव परिसरात तीन-चार दिवसांपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. …
Read More »ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद!
बेळगाव : गोल्फ कोर्स परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी सहा पिंजरे आणि पंधरा ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दरम्यान गोल्फ मैदानाजवळील ट्रॅप कॅमेरामध्ये बिबट्या कैद झाला आहे. मात्र सर्वांना धडकी भरवणारा बिबट्या वन खात्याच्या पिंजऱ्यात केव्हा कैद होणार याचीच सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. गेले तीन दिवसांपासून बिबट्या शोधासाठी अथक …
Read More »बेळगाव शहर, तालुका, खानापूर तालुक्यातील शाळांना सुट्टी
बेळगाव : गेल्या तीन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे बेळगाव शहर तालुका आणि खानापूर तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांना व अंगणवाडी केंद्रांना सुट्टी देण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. बेळगाव जिल्हा माहिती खात्याला दिलेल्या प्रतिनिधी पत्रकात नितेश पाटील यांनी सोमवारी या शाळांना सुट्टीची घोषणा केली आहे. तीन दिवसापासून बेळगाव आणि खानापूर तालुक्यामध्ये …
Read More »गोल्फ कोर्स परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शाळांना सुट्टी
बेळगाव : गोल्फ कोर्स परिसरात बिबट्याचा वावर असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गोल्फ कोर्स परिसरातील एक किलोमीटर परिघातील मधील शाळांना सोमवारी सुट्टी देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री बारा वाजताच्या दरम्यान ट्रॅप कॅमेरा बिबट्याची छायाचित्रे आल्यानंतर वन खात्याने शोध मोहीमेचा केंद्रबिंदू गोल्फ कोर्स परिसर केला आहे. गोल्फ कोर्स …
Read More »मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अध्यक्षपदी रमाकांत कोंडुस्कर
बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांची सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी तर देवस्थान कमिटी पंच रणजीत चव्हाण पाटील कार्याध्यक्षपदी निवड झाली. पाटील गल्ली येथील सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिराच्या सभागृहात रविवारी सायंकाळी मध्यवर्ती गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये 2022-23 साठी कोंडुस्कर यांची सर्वानुमते महामंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात …
Read More »वडगाव सपार गल्लीत घर कोसळले: सुदैवाने दाम्पत्य बचावले वृद्ध
बेळगाव : बेळगाव शहरात मुसळधार पावसामुळे घर कोसळल्याची घटना सपार गल्ली येथे घडली असून घरात राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याचा सुदैवानेच जीव वाचला. बेळगाव शहरात गेले काही दिवस सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातील वडगाव सपार गल्ली येथे एक जुने घर कोसळले. या घटनेत एक वृद्ध जोडपे सुदैवाने बचावले आहेत. …
Read More »श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर आदर्श धार्मिक पर्यटनस्थळ बनवणार
आ. श्रीमंत पाटील ; मंगसुळीत मंदिर जीर्णोद्धारसह साडेचार कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन अथणी : मंगसुळी गावच्या विकासासाठी तसेच येथील श्री क्षेत्र खंडोबा देवा मंदिरासाठी अधिकाधिक निधी आणून विकास केला जात आहे कर्नाटक महाराष्ट्रसह अन्य राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा मंदिर एक आदर्श धार्मिक पर्यटन स्थळ बनवू, असा विश्वास माजी …
Read More »बडेकोळमठ क्रॉसजवळ बस उलटून 5 प्रवाशी जखमी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील बडेकोळमठ क्रॉसजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर सरकारी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती उलटली. बसमध्ये 35 प्रवासी होते. बेळगावहून हिरेकेरूरकडे निघालेल्या बसवरील बडेकोळमठ क्रॉसजवळील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींना बेळगाव …
Read More »राष्ट्रीय एकतेसाठी मिनी मॅरेथॉन स्पर्धा
बेळगाव : बेळगाव येथील मराठा लाईट इंन्फट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे शालेय विद्यार्थ्यासाठी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मराठा लाईट इंन्फट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी ध्वज दाखवून मिनी मॅरेथॉन स्पर्धेला चालना दिली. बेळगावातील विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान आणि देशभक्तीची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta