आ. श्रीमंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन : उत्तम बांधकामाबाबत प्रशंसा कागवाड : ऐनापूर येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचा कळस उभारणी समारंभ माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांच्या हस्ते झाला. तत्पूर्वी त्यांनी येथे बांधलेल्या मंदिराची पाहणी करून उत्तम बांधकाम झाल्याची पोचपावती दिली. ऐनापूर येथे विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून …
Read More »संजीव कांबळे यांनी स्वीकारला सीईएन पोलीस स्थानकाचा पदभार
बेळगाव : बेळगाव शहरातील सायबर, इकॉनॉमिक्स ऑफेन्स आणि नार्कोटिक्स अर्थात सीईएन पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पदी संजीव कांबळे यांनी पदभार स्वीकारला आहे. मावळते पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी कांबळे यांना पदभार सोपवला. गड्डेकर यांची हेस्कॉम जागृत दलाचे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. गेल्या दोन वर्षात गड्डेकर यांनी …
Read More »कामगार व शेतकर्यांच्या हक्कांसाठी संयुक्त लढा शेकापचे काम चालूच : अॅड. राजाभाऊ पाटील यांचे मत
बेळगाव : शेतकरी आणि कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांना मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. पण, सीमाभागात हा पक्ष महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यात सहभागी आहे. त्यामुळे पक्षाचे स्वतंत्र कामकाज होत नाही. पण, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी संयुक्तरित्या लढा देण्याचे काम सुरूच आहे, असे मत अॅड. राजाभाऊ पाटील …
Read More »अवचारहट्टी येथील श्री विठ्ठलाईदेवी मंदिराचे चौकट पूजन
बेळगाव : अवचारहट्टी येथील श्री विठ्ठलाईदेवी मंदिराचे चौकट पूजन कार्यक्रम गुरूवारी करण्यात आला. ओबीसी मोर्चा राज्य सेक्रेटरी व सकल मराठा समाज संयोजक किरण जाधव आणि श्री. सोमनाथ धामणेकर यांच्या हस्ते चौकट पूजन करण्यात आले. श्री विठ्ठलाईदेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आहे. आकर्षक असे मंदिर बनवण्यात येत आहे. या ठिकाणी …
Read More »वाहतुकीवेळी ट्रकमधून होणारी तांदळाची नासाडी समाजसेवक संतोष दरेकर यांनी रोखली!
बेळगाव : तालुक्यातील देसूर रेल्वे स्थानकावरून तांदूळ भरलेला ट्रक गणेशपूर गोदामाकडे जात होता. यावेळी पोते फाटून तांदूळ वाटेत पडून वाया जात होता. हे लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी वाया जाणार्या तांदळाची नासाडी रोखली. तांदूळ रस्त्यावर पडल्याचे पाहून संतोष दरेकर यांनी टिळकवाडीच्या तिसर्या रेल्वे गेटपासून ट्रकचा पाठलाग करून ट्रक …
Read More »शहरात अवजड वाहनांना सकाळी 8 ते रात्री 11 या वेळेत प्रवेशबंदी!
बेळगाव : बेळगावात दोन बालकांच्या अपघाती मृत्यूनंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी शहरात सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. बेळगावातील कॅम्प आणि फोर्ट रोडवर गेल्या दोन दिवसांत अवजड वाहनांच्या धडकेमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे बेळगाव शहर पोलिसांच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यामुळे …
Read More »बेळगाव शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यासंदर्भात कॅम्प परिसरातील रहिवाशांचे आंदोलन
बेळगाव : दोन दिवसांत दोन शाळकरी मुलांचा अपघाती मृत्यू होऊनही बेळगाव पोलिसांना गांभीर्य वाटलं नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कॅम्पवासीयांनी आज सकाळी आंदोलन केले. बेळगाव शहरात अवजड वाहनांना बंदी घालावी, कॅम्प परिसरात स्पीडब्रेकर बसवावेत आणि शाळेच्या वेळेत पोलिस तैनात करावेत, या मागणीसाठी कॅम्पवासियांनी आंदोलन केले. बेळगाव शहरात गेल्या चार दिवसांत …
Read More »श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवानिमित्त हभप सौ. स्नेहल पित्रे यांची कीर्तने
बेळगाव : बाजार गल्ली वडगाव येथील स्वकुळ साळी समाजातर्फे भगवान श्री जिव्हेश्वर मंदिरात श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव दि. 10 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. श्री जिव्हेश्वर जन्मोत्सवा निमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रम होणार आहेत. दि. 7 ते 9 पर्यंत डोंबिवली (मुंबई) येथील प्रसिध्द कीर्तनकार हभप सौ. स्नेहल पित्रे यांची कीर्तने होणार …
Read More »केदनूर ग्रामस्थांचे माजी सैनिकाविरोधात जिल्हाधिकार्यांना निवेदन
बेळगाव : श्रावण मासानिमित्त केदनूर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या भजन आणि पूजा कार्यक्रमादरम्यान एका माजी सैनिकाने मंदिरात धुडगूस घालून माईक तोडल्याचा प्रकार केला. सदर माजी सैनिकाने येथील भाविकांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ देखील केली असून याप्रकरणी न्याय मागण्यासाठी केदनूर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. केदनूर गावातील विठ्ठल रखुमाई देवस्थानात …
Read More »सार्वजनिक वाचनालयातर्फे क्रांतीसिंह नाना पाटील जयंती साजरी
बेळगाव : सार्वजनिक वाचनालय याच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांची 122 वी जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. वाचनालयाचे ज्येष्ठ कार्यकारी सदस्य गोविंद राऊत यांच्या हस्ते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर गोविंद राऊत यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याबद्दल थोडक्यात माहिती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta