बेळगाव: गुरुजी डॉ.चंद्रशेखर यांच्या हत्येनंतर काही तासात त्यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी दोन मारेकऱ्यांना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथे अटक केली असून ते गुरुजींचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. महांतेश शिरोळ आणि मंजुनाथ दुमवाड अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. या हत्येत वनजाक्षी या महिलेचा सहभाग असल्याचे उघड …
Read More »धूपटेश्वर मंदिरात पावसासाठी गाऱ्हाणे
बेळगाव : प्रतिवर्षाप्रमाणे हनुमाननगर येथील धूपटेश्वर मंदिरात गाऱ्हाणे घालून बेळगाव व परिसरातील जनतेसाठी पाऊस मागण्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कंग्राळ गल्लीतील पंचमंडळ सल्लागार मंडळ व शेतकरी संघटना यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरवातीस उपस्थित मान्यवर व पंचमंडळीच्या हस्ते पूजा करण्यात आली. देवस्थान मंडळाचे अध्यक्ष श्री. रणजित …
Read More »मुतगे येथील विहिरीत आढळला शिरविरहित मृतदेह
बेळगाव : शिरविरहित मृतदेह विहिरीत आढळून आल्याची खळबळजनक घटना बेळगाव तालुक्यातील मुतगा येथे उघडकीस आली आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी सुमारे ३० वर्षे वयाच्या तरुणाचा गळा चिरून शीर वेगळे करून धड विहिरीत टाकून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. मुतगा येथे आज सकाळी-सकाळीच सगळ्यांना घाम फोडणारी घटना उघडकीस आली. अज्ञात युवकाचा खून करून त्याचे …
Read More »बेळगांव – जांबोटी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी
नगरसेवक रवी साळुंखे यांची निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी बेळगाव : बेळगांव ते जांबोटी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. बेळगावहून गोव्याला जाण्यासाठी चोर्ला मार्ग हा जवळचा मार्ग आहे. बेळगांव- गोवा मार्गावर वाहनांची वर्दळ जास्त असते. शिवाय बेळगावहून गोव्याला भाजीपाला पुरवठा करणारी वाहने …
Read More »नूतन पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. संजीव पाटील यांनी पदभार स्वीकारला
बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. संजीव पाटील यांनी आज मावळते पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्याकडून पदभार स्वीकारला. चारच दिवसांपूर्वी डॉ. संजीव पाटील यांची बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली केल्याचा आदेश राज्य सरकारने बजावला होता. त्यानंतर आज त्यांनी पदभार स्वीकारला. मावळते पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी पुष्पगुच्छ …
Read More »अतिवाड, बेकिनकेरे गावात जलजीवन मिशन योजनेस चालना
बेळगाव : देशातील प्रत्येक कुटुंबाला पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरे मिळावित, तसेच जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून सर्वांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता सरकारने अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. यातील एक योजना अतिवाड आणि बेकिनकेरे गावांमध्ये सुरू करण्यात आली. यावेळी खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते येथील गावात जीवन मिशन योजनेच्या कार्याला चालना …
Read More »अनमोड घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प
रामनगर : गोवा- कर्नाटक हद्दीतील अनमोड घाटात दरड कोसळून आज वाहतूक ठप्प झाली. आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान सकाळी 9 च्या सुमारास रामनगर मार्गे गोव्याला जाणाऱ्या महामार्गावरील अनमोड घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोसळलेली दरड बाजूला करण्याचे काम युध्द पातळीवर सुरू …
Read More »हावेरीत पत्रकारावरील हल्ल्याचा बेळगावात श्रमिक पत्रकारांकडून निषेध
बेळगाव : हावेरी येथे न्यूज फर्स्टच्या बातमीदारावर हल्ला केल्याप्रकरणी नकली शेतकरी आंदोलक मंजुळा पुजारी हिच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बेळगाव जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून मुख्यमंत्र्यांच्या नावचे निवेदन देण्यात आले. हावेरी येथे न्यूज फर्स्टच्या प्रतिनिधींवर हल्ला केल्याच्या घटनेचा निषेध करून सोमवारी बेळगाव जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या …
Read More »सार्वजनिक वाचनालयातर्फे संगीत भजन स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने गेल्या पाच वर्षापासून श्रावण मासानिमित्त संगीत भजन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यंदाचे हे सहावे वर्ष आहे. यंदाची सदर स्पर्धा बुधवार दि. 24 ते रविवार 28 ऑगस्ट 2022 या पाच दिवसांच्या कालावधीत दररोज दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेली …
Read More »श्रीराम सेना हिंदुस्तानच्या वतीने डेंग्यू, चिकनगुनिया लसीकरण वितरण
बेळगाव : बेळगावच्या शहराच्या दक्षिण भागात श्रीराम सेना हिंदुस्तानच्या वतीने डेंग्यू, चिकनगुनिया प्रतिबंधक मेगा लसीकरण मोहिमेस रविवारी सकाळी प्रारंभ झाला. रविवारी सकाळी शहापूर भागातल्या विविध भागातून वडगाव, अनगोळ परिसरात असे एकूण 40 ठिकाणी डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीलाच सकाळी वयोवृद्ध नागरिक, महिला, बालक आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta