Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

एकसंघ होऊन निवडणूक लढविण्याची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची सूचना

बेळगाव : वायव्य पदवीधर मतदार, शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बेळगावमध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित नेत्यांना सर्वांनी एकसंघ होऊन निवडणूक लढविण्याची कडक सूचना प्रल्हाद जोशींनी दिली. बेळगाव जिल्ह्यात भाजपात दुफळी झाल्याचे दिसून येत आहे. या दुफळी मोडीत काढून पक्ष …

Read More »

बेळगाव भाजपमधील दुफळीच्या चर्चेला पालकमंत्र्यांच्या दुजोरा!

बेळगाव : बेळगाव भाजपमध्ये दुफळीचे राजकारण सुरु असल्याची बाब सर्वश्रुत आहे. आता या गोष्टीला स्वतः पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दुजोरा दिला आहे. बेळगाव जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये दुफळी असूनही आजच्या प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखालील बैठकीला सर्व नेत्यांची उपस्थिती असल्याचे पालकमंत्री म्हणाले. बेळगाव भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरु असल्याची चर्चा सुरु असून या …

Read More »

शिक्षक पात्रता परीक्षा केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे मागवलेल्या पदवीधर आणि प्राथमिक शिक्षकांच्या १५ हजार जागांसाठी उद्यापासून २ दिवस पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांसह परीक्षा केंद्रांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. पदवीधर आणि प्राथमिक शिक्षकांच्या १५ हजार जागांसाठी सार्वजनिक शिक्षण खात्याने उद्या २१ …

Read More »

हुतात्मा स्मारक परिसराचे सपाटीकरण

बेळगाव : 1 जून 1986 रोजी कन्नड सक्ती आंदोलनात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दरवर्षी एक जून रोजी हुतात्मा दिन काळात हुतात्म्यांना अभिवादन केले जाते या पार्श्वभूमीवर येथील हुतात्मा स्मारक परिसराची स्वच्छता करत परिसराचे सपाटीकरण करण्यात आले. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्मा स्मारक परिसरामध्ये 1 …

Read More »

मिनी ऑलिंपिकमध्ये अमन सुणगार याचे अभिनंदनीय यश

बेळगाव : बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या 2 र्‍या कर्नाटक राज्य मिनी ऑलिंपिक क्रीडा महोत्सवातील जलतरण प्रकारात बेळगावचा युवा होतकरू जलतरणपटू अमन सुणगार याने तीन रौप्य पदकांसह एकूण 5 पदके पटकावून अभिनंदनीय यश संपादन केले आहे. 2 र्‍या कर्नाटक राज्यस्तरीय मिनी ऑलम्पिक अंतर्गत बेंगलोरच्या बसवणगुडी क्वेटिक सेंटर येथे पार पडलेल्या …

Read More »

दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकार्‍यांकडून सन्मान

बेळगाव : यंदाच्या एसएसएलसी अर्थात् दहावीच्या परीक्षेमध्ये 625 पैकी 625 गुण संपादन करणार्‍या बेळगाव जिल्ह्यातील 10 सर्वात प्रतिभावंत विद्यार्थी -विद्यार्थिनींचा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आपल्या कार्यालयात सत्कार करून अभिनंदन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमाप्रसंगी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 6 आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 4 विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या शैक्षणिक साधनेची जिल्हाधिकार्‍यांनी मुक्त कंठाने प्रशंसा …

Read More »

केएलई एमबीएच्या विद्यार्थिनींचे राष्ट्रीय स्तरावर सुयश

बेळगाव : केएलई संस्थेच्या डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या एमबीएच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय पातळीवरील व्यवस्थापन महोत्सवांमध्ये स्पृहणीय यश संपादन केले आहे. डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या सुषमा राणे, सुषमा कोले आणि बरूषा डी रेगो या विद्यार्थिनींनी नॅशनल लेव्हल मॅनेजमेंट फेस्ट अर्थात राष्ट्रीय पातळीवरील …

Read More »

राकसकोप जलाशयातील पाणी पातळीत वाढ

बेळगाव : मान्सूनपूर्व पावसामुळे राकसकोप जलाशयातील पाणी पातळी एक इंचाने वाढ झाली आहे. पाऊस असाच कायम राहिला तर पुढील चोवीस तासात जलाशयाची पातळी एक फुटांनी वाढेल अशी माहिती पाणीपुरवठा व मंडळाकडून मिळाली आहे. राकसकोप जलाशयातील पाणलोट क्षेत्र महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यात आहे. गेल्या चोवीस तासात चंदगड तालुक्यात 55 मिलीमीटर पाऊस झाला …

Read More »

कडोलीतील शेतकर्‍याची आत्महत्या

बेळगाव : कडोली (ता. जि. बेळगाव) येथील मायण्णा गल्लीतील सुप्रसिद्ध शेतकरी आणि गावातील प्रसिद्ध देसाई कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती कल्लाप्पा उर्फ कल्लण्णा सिद्धाप्पा देसाई यांनी आज शनिवारी सकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने 68 वर्षीय कल्लाप्पा यांनी आत्महत्या केल्याचे समजते. देसाई कुटुंबामध्ये गेल्या आठवड्याभरापासून …

Read More »

विधान परिषदेसाठी हनुमंत निरानी यांचा अर्ज दाखल

बेळगाव : वायव्य पदवीधर मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. भाजपचे उमेदवार हनुमंत निरानी यांनी आज या निवडणुकीसाठी आपला सांकेतिक उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. हनुमंत निरानी याआधी एमएलसी होते. आता दुसऱ्यांदा …

Read More »