Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगावची भक्ती हिंडलगेकर फेडरेशन कप स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये चमकली

Spread the love

 

बेळगाव : रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि राजस्थान स्केटिंग असोसिएशन आयोजित दुसऱ्या फेडरेशन कप 2022 स्पर्धेत बेळगावची स्केटिंगपटू भक्ती हिंडलगेकर चमकली.

26 जुलै ते 29 जुलै 2022 दरम्यान जोधपूर राजस्थान येथे ही रोलर आणि ईनलाइन हॉकी स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जवळपास 600 स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता. ईनलाइन हॉकी स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये भक्ती हिंडलगेकर हिने कांस्यपदक मिळविले.

भक्ती हिंडलगेकर ही गेल्या 10 वर्षांपासून केएलई सोसायटीच्या स्केटिंग रिंकवर तसेच रोटरी कॉर्पोरेशन स्पोर्ट्स अकादमी स्केटिंग रिंक व गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल इंटरनॅशनल स्केटिंग ट्रॅकवर स्केटिंगचा सराव करते. तिला डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, के.आर.एस.ए. सरचिटणीस इंदुधर सीताराम, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन तसेच स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, सक्षम जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *