Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

बेळगाव शहर परिसरात रमजान ईद भक्तिभावाने साजरा

बेळगाव : बेळगाव शहर आणि उपनगरातील समस्त मुस्लिम बांधवांनी आज मंगळवारी रमजान ईद सण अत्यंत श्रद्धा भक्तिभावाने साजरा केला. यानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देण्याबरोबरच शहरात ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठणाचे कार्यक्रम शांततेत पार पडले. गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे सरकारच्या आदेशानुसार रमजान ईद सण घरगुती साध्या पद्धतीने साजरा केला जात होता. त्याचप्रमाणे …

Read More »

आंतरराष्ट्रीय परिषदेत जायंट्स मेन सन्मानित

बेळगाव : गेल्या छत्तीस वर्षांपासून लोकसेवेचे व्रत घेऊन समाजजीवनात काम करणार्‍या बेळगावच्या जायंट्स मेन या संघटनेला त्यांच्या सेवाकार्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे जायंट्सचे आंतरराष्ट्रीय परिषद झाली नव्हती. यावर्षीची परिषद ही दमन सारख्या केंद्रशासित प्रदेशात झाली. तीन दिवस चाललेल्या परिषदेत जायंट्सच्या संघटनांनी कोणत्या पद्धतीने …

Read More »

छ. शिवराय व बसवेश्वर यांचे विचार आधुनिक काळात सदोदित प्रेरणा देतील : ज्येष्ठ विचारवंत के. जी. पाटील

शिवबसव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर – महावीर जयंतीनिमित्त व्याख्यान : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजन बेळगाव : चारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी केलेला विचार हा त्यांनी किती प्रतिकूल परिस्थितीत हे सतीचे वाहन हाती घेतले होते याचा अचंबा वाटतो. मध्ययुगीन राजवटीत अनेकांच्या विरोधात बंड करणे म्हणजे प्राणाशी गाठ असायची परंतु शिवाजी …

Read More »

पोहताना मारलेला ‘सूर’ जीवावर बेतला!

बेळगाव : पाण्यात स्विमींग पूलमध्ये मारलेला सूर एका युवकाच्या जीवावर बेतला असून सूर मारल्यानंतर डोकीला जबर मार लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बेळगाव शहरातील हनुमान नगर भागांत ही घटना घडली आहे. 17 वर्षीय युवकाचा डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी बारा वाजता हनुमान नगर येथे घडली आहे. …

Read More »

शांताई वृध्दाश्रमाला जिल्हाधिकारी हिरेमठ यांची भेट

बेळगाव : जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी विविध समारंभात त्यांना मिळालेल्या असंख्य शाली वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना देऊन त्यांच्यासोबत जेवण करून काही काळ आनंदाने घालविला. बामणवाडीतील समाजसेवक व माजी महापौर विजय मोरे चालवीत असलेल्या शांताई वृध्दाश्रमाला सोमवारी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी सपत्नीक भेट दिली. यावेळी त्यांनी विविध समारंभात त्यांना मिळालेल्या असंख्य शाली …

Read More »

स्वतंत्र बैलहोंगल जिल्ह्याची मागणी!

बेळगाव : बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासंदर्भात पुन्हा एकदा चर्चेला ऊत आला असून अनेक राजकारणी बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासाठी आग्रह करत आहेत. याच पार्श्वभूमीवर संकेश्वर येथे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांची भेट घेत बैलहोंगल येथील मठाधीशांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी केली आहे. बेळगाव, चिकोडी, आणि बैलहोंगल अशा …

Read More »

बेळगाव जिल्हा कार्यनिर्वाहक संघाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे सन्मानित

बेळगाव : बेळगावात पत्रकार क्षेत्रात योगदान दिलेले निवृत्त ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांना त्यांनी बजावलेल्या सेवेसाठी बेळगाव जिल्हा कार्यनिर्वाहक संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. जिल्हा कार्यनिर्वाहक संघाच्यावतीने दर रविवारी एका ज्येष्ठ पत्रकाराचा सत्कार करण्यात येतो त्याअंतर्गत जिल्हा अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे यांनी सत्कार केला. बेळगावात 35 वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात योगदान दिलेल्या प्रशांत …

Read More »

कराटेपटू पुजा पाटील हिला ब्लॅकबेल्ट प्रदान

बेळगाव : कराटेपटू पुजा पाटील हिला ब्लॅकबेल्ट प्रदान करण्यात आला. इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते पुजा पाटील हिला ब्लॅकबेल्ट व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हनुमान नगर बेळगाव, सेकंड स्टेज येथील श्री. हनुमान मंदिर सभागृहात दिनांक 30 एप्रिल 2022 रोजी कराटेची बेल्ट …

Read More »

सकल मराठा समाजाच्या दक्षिण विभाग संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

बेळगाव : सकल मराठा समाजाच्या दक्षिण विभाग संपर्क कार्यालयाचे उद्घाटन समारंभ आज शिवजयंती निमित्त गोवावेस येथील प्रियंका हॉटेल समोर थाटात संपन्न झाला. कार्यालयाचे उद्घाटन मराठा जागृती निर्माण संघाचे संस्थापक अध्यक्ष गोपाळराव बिर्जे यांच्या हस्ते करण्यात आले. तर डॉ. मिलिंद हलगेकर यांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी महादेव पाटील यांनी …

Read More »

माळी गल्ली येथे शिवजन्मोत्सव उत्साहात

बेळगाव : बेळगाव शहरातील माळी गल्ली येथील युवक मंडळातर्फे आज सोमवारी छ. शिवाजी महाराज यांची जयंती अर्थात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माळी गल्ली येथे आयोजित या शिवजन्मोत्सव कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नूतन नगरसेविका ज्योती राजू कडोलकर या उपस्थित होत्या. नगरसेविका कडोलकर यांच्या हस्ते पूजा विधी करून शिवजन्मोत्सव साजरा …

Read More »