Monday , September 21 2026
Breaking News

अपघातात बेळगुंदीच्या जवानाचा दुदैवी मृत्यू

Spread the love

बेळगाव : स्विफ्ट कारची झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात बेळगुंदी गावच्या जवानाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे.
बेळगाव -राकस्कोप रोडवर बाकनूर क्रॉस नजीक असलेल्या नाल्याजवळ ही घटना घडली असून या घटनेमध्ये ओमकार महादेव हिंडलगेकर (वय 23) रा. कलमेश्वर गल्ली बेळगुंदी या जवानाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, स्वीप्ट कारचे नियंत्रण सुटल्याने झाडाला आदळली आणि पलटी झाली. गाडीचा वेग इतका होता की गाडी चक्काचूर झाली. ओमकार हा चार वर्षापूर्वी सैन्यदलात भरती झाला होता. सध्या तो अहमदनगर येथे सेवा बजावत होता. त्याच्या पश्चात्य आई, वडील, विवाहित भाऊ, बहीण असा परिवार आहे.

ओमकार हा गेल्या दहा दिवसापूर्वी मोठ्या भावाच्या लग्नासाठी सुट्टी निमित्त आला होता. सोमवारी रात्री कडोली येथील आपल्या मामाच्या गावी तो गाडी द्यायला बेळगुंदीहून बेळगावकडे जात असतेवेळी रात्री साडे अकराच्या दरम्यान हा अपघात घडला आहे.
या अपघाताची ग्रामीण पोलीस स्थानकत नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मंगळवारी सकाळी त्याचे पार्थिव बिम्स शवागारात शवचिकित्सा केल्यावर नातेवाईकांकडे सोपवण्यात येणार आहे. सीमेवर देशसेवा बजावणाऱ्या बेळगुंदीच्या जवानाचा अपघातात मृत्यू झाल्याने बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागात हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *