Sunday , July 26 2026
Breaking News

भारत विकास परिषदेच्यावतीने स्थापना दिवस अपूर्व उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : भारत विकास परिषद बेळगांवच्यावतीने परिषदेचा 60 वा स्थापना दिवस, दहावी व बारावीच्या प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच डाॅक्टर्स डे निमित्त सेवाभावी डाॅक्टरांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम रविवारी सायंकाळी आयोजिण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. एस्. एन्. शिगली व डाॅ. सविता कड्डू उपस्थित होते.
प्रारंभी विनायक मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम सादर केले. स्वरा मोरे हिने सुश्राव्य सरस्वतीवंदना प्रस्तुत केली. त्यानंतर भारतमाता, स्वामी विवेकानंद व परिषदेचे संस्थापक डाॅ. सूरज प्रकाश यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष विनायक घोडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. जे. जी. नाईक यांनी भारत विकास परिषदेच्या सेवा व संस्कार उपक्रमांची माहिती दिली. व्ही. आर. गुडी यांनी शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. हेमंत देशपांडे यांनी नवीन सदस्यांना शपथ देवविली. डाॅ. व्ही. बी. यलबुर्गी यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला.
वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डाॅ. एस्. एन्. शिगली व डाॅ. सविता कड्डू यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच दहावीमध्ये शहरात प्रथम आलेल्या वेंकटेश डोंगरे व अमोघ कौशिक तसेच बारावी विज्ञान शाखेत प्रणीत कल्याणशेट्टी, वाणिज्य शाखेत रोचन शिंदे व कला शाखेत महेश बामणे यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन खास गौरविण्यात आले. सत्कारमूर्तिंनी मनोगते व्यक्त केली.
प्रा. अरूणा नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सेक्रेटरी एम्. जी. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास डाॅ. व्ही. एन्. जोशी, रामचंद्र तिगडी, एन्. बी. देशपांडे, सुहास गुर्जर, सुखद देशपांडे, स्वाती घोडेकर, उमा यलबुर्गी आदि उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *