Sunday , September 20 2026
Breaking News

बिम्समध्ये चोरी करणार्‍याला पकडले

Spread the love

बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात चोरी करणार्‍या चोरट्याला रुग्णांचे नातेवाईक व नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात घडली.
बेळगाव येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून चोरी करणार्‍या सराईत चोराला रुग्णांचे नातेवाईक व नागरिकांनी पकडून एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात दिले. रुग्णांचे नातेवाईक आणि कर्मचार्‍यांचे पैसे आणि मोबाईल चोरल्याप्रकरणी आरोपी मारुती मंगसुळी याला काल, सोमवारी रात्री अटक करून एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी आरोपी मारुती मंगसुळीकडून बिम्स रुग्णालयातून चोरलेले दोन मोबाईल फोन व पैसे जप्त करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *