Monday , December 15 2025
Breaking News

बेळगाव

हरेकृष्ण रथयात्रा मंडपाची मुहूर्तमेढ संपन्न

बेळगाव : दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे काढली जाणारी राधा कृष्ण, गौर निताय हरेकृष्ण रथयात्रा यावर्षी दि. 17 एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. या रथयात्रेच्या निमित्ताने इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरासमोर मंडप उभारण्यात येणार असून त्या मंडपाची मुहूर्तमेढ रविवारी सकाळी इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांच्या …

Read More »

शरद पवार यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या घरावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा बेळगावात सर्वपक्षीयांकडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्याचा ठराव झाला. शरद पवार यांच्या घरावर भ्याड हल्ला करण्यात आला होता. याचा निषेध …

Read More »

गृहमंत्री संघाचे एजंट, त्यांनी राजीनामा द्यावा : आ. अंजली निंबाळकरांची मागणी

बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट असल्याप्रमाणे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र हे बेजबाबदार विधाने करून जातीय सलोखा बिघडवत आहेत. त्यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी केली. बेळगावातील काँग्रेस भवनात शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना आ. निंबाळकर म्हणाल्या, बंगळुरात चंद्रू याच्या हत्येप्रकरणी गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी …

Read More »

आंबेवाडी गावातील रस्त्याची दुरावस्था

बेळगाव : आंबेवाडी येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी रस्त्यावर मातीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता अधूनमधून कोसळणार्‍या पावसाने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून दुचाकी घसरण्याच्या घटनेत वाढ होत आहे. येथील रस्त्याचा विकास करण्याकरिता रस्ते खोदाई करण्यात आली. मात्र काम पूर्ण करण्याकडे ग्रामपंचायतीने …

Read More »

गांजा विक्री प्रकरणी दोघाना अटक

बेळगाव : गांजा विकणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक करून मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी खंजर गल्ली येथील युनिस अब्दुल कादर वय 23 आणि पंजीबाबा कॉलनीतील सुलतान अहमद हमीद शहा यांना अटक करून त्यांच्या जवळून 500 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. खंजर गल्लीतील पार्किंग जवळ गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मार्केट …

Read More »

शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी ‘विश्वासघात’ सप्ताह

बेळगाव : बेळगाव येथील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी संघटनांनी आता शेतकरी विश्वासघात सप्ताहाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने एका सप्ताहामध्ये विविध ठिकाणी निदर्शने आणि आंदोलन करून सरकारला आपल्या मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी करण्यात येणार आहे. 19 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारने बनवलेले तीन कृषी कायदे मागे घेतले होते आणि एम …

Read More »

आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवाचे बेळगावात आयोजन

बेळगाव : बेळगाव शहराला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा आहे संगीत कला साहित्य व मनोरंजनाच्या क्षेत्रात बेळगावच्या कलाकारांनी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजच्या युवा पिढीला देखील आपल्या समृद्ध वारशाचे भान आहे. बेळगावकरांना कलेची उत्तम जाण आहे आणि यातूनच प्रोत्साहन मिळते. सर्व वयाच्या लोकांना एकत्र मिळून बेळगावचा हा सांस्कृतिक …

Read More »

जायंट्सची राज्यस्तरीय परिषद सोमवारी

बेळगाव : जायंट्स वेल्फेअर फौंडेशन या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेच्या शाखा क्रमांक सहाची राज्यस्तरीय परिषद सोमवार दिनांक 11 एप्रिल रोजी संपन्न होत आहे एस. पी. एम. रोडवरील शिवम हॉल (प्रकाश टॉकीज शेजारी) येथे होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन सकाळी साडेनऊ वाजता मराठा मंदिराचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक श्री. आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते …

Read More »

खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघाच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेची मासिक बैठक शुक्रवार दि. ८ रोजी बी.ई.ओ. कार्यालयात पार पडली. बैठकीला तालुका शिक्षक संघटनाचे अध्यक्ष वाय. एम. पाटील होते. यावेळी शिक्षकांच्या विविध समस्यांविषयी चर्चा करण्यात आली. तसेच बीईओ लक्ष्मणराव यक्कुंडी यांनी शिक्षक संघटनेच्या मागणीप्रमाणे शिक्षकांची अरिअर्स बिले, फेस्टिव्हल ॲडव्हान्स बिले तसेच सरेंडर …

Read More »

श्री ऑर्थोतर्फे यांचा झाला सपत्नीक सत्कार

बेळगाव : गेल्या काही दिवसांपूर्वी बेंगलोर येथे झालेल्या एका कार्यक्रमात कर्नाटकातील 135 पोलीस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री पदक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील एकूण सहा पोलीस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री पदक बहाल करण्यात आले. त्यामुळे या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात करिता बेळगाव येथील हॉटेल सन्मान नजीक असलेल्या श्री ऑर्थो अँड ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये कार्यक्रम …

Read More »