Thursday , September 19 2024
Breaking News

महाराष्ट्र

देवरवाडीत पेयजल योजनेच्या उद्घाटनचा शुभारंभ

चंदगड : देवरवाडी येथे पेयजल योजनेचा शुभारंभ केंद्र सरकारच्या वतीने ग्रामीण भारत स्वच्छ व समृद्ध बनविण्यासाठी पेयजल योजना राबवली जात आहे. त्यासाठी राज्यांना पेयजल योजना राबविण्यासाठी तांत्रिक व आर्थिक वित्त सहाय्य केले जाते. देवरवाडी ता. चंदगड येथील ग्रामपंचायतीने गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नातून केंद्र …

Read More »

देवरवाडी येथे राजर्षी शाहू महाराजांना स्मृती शताब्दी निमित्त 100 सेकंद स्तब्ध राहून विनम्र अभिवादन

चंदगड : ग्रामपंचायत देवरवाडी येथे रयतेचे राजे, कलाप्रेमी, आरक्षणाचे जनक, प्रजापती, राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सरपंच गीतांजली सुतार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गावातील विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांबद्दल आदर भावना व्यक्त केल्या. तसेच यावेळी उपसरपंच गोविंद आढाव, ग्रामपंचायत सदस्य राजाराम जाधव, बसवंत कांबळे, सदस्या जयश्री करडे, …

Read More »

ना. सुभाष देसाई यांच्याहस्ते उद्या प्रबोधन कौशल्य निकेतनचे उद्घाटन होणार

माणगांव (नरेश पाटील) : महाराष्ट्र राज्य उद्योगमंत्री ना. सुभास देसाई यांच्या हस्ते शनिवारी दि. ७ मे रोजी सायंकाळी ५ वा. जे. बी. सावंत एज्युकेशन सोसायटी बामणोली रोड माणगांव येथे प्रबोधन कौशल्य निकेतन पहिला टप्पाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला ना. सुभाष देसाई यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती …

Read More »

’लोकराजा’ला अभिवादन : …अन् 100 सेकंद कोल्हापूर स्तब्ध झाले!

कोल्हापूर : रयतेचे राजे राजर्षी शाहू छत्रपतींना स्मृती शताब्दीनिमित्त आज कोल्हापुरात अभिवादन करण्यात आले. त्यासाठी कोल्हापुरीतील तमाम जनता आज (दि. शुक्रवार) सकाळी 10 वाजता 100 सेकंद आहे त्या ठिकाणी स्तब्ध राहिली आणि लोकराजाला तमाम जनतेने मानवंदना दिली. राजर्षी शाहू छत्रपतींचे यंदाचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने यानिमित्त लोकराजा …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला धक्का; दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणावरून मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारने या संदर्भात केलेला कायदा फेटाळून लावत 15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणा संदर्भात आज महत्वपूर्ण सुनावणी होती, यावेळी न्यायालयाने दिलेल्या …

Read More »

संभाजीराजे महाविकास आघाडीसोबत राहण्याची शक्यता; काँग्रेस की शिवसेना याचा लवकरच फैसला

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करत राज्यभर चर्चेत आलेले संभाजीराजे छत्रपती यांची नवी राजकीय इनिंग लवकरच सुरू होणार आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची मुदत 3 मे रोजी संपल्याने त्यांची नवी राजकीय वाटचाल महाविकास आघाडीच्या दिशेने होण्याचे संकेत आहेत. मात्र, यामध्येही शिवसेना की काँग्रेस यांचा फैसला होण्यास विलंब लागण्याची चिन्हे आहेत. …

Read More »

मशिदीवर भोंगे न लावणार्‍या मौलवींचे मी आभार मानतो : राज ठाकरे

मुंबई : मशिदींवरील भोंग्यांबाबत राज्यभरात सुरू असलेल्या गदारोळावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी मशिदीवर भोंगे न लावणार्‍या मौलवींचे आभार मानले आहेत. ’महाराष्ट्रात 90 ते 92 टक्के ठिकाणी आज सकाळची अजान झाली नाही. सर्व ठिकाणी आमचे लोक तयारच होते. या मशिदी चालवणार्‍या मौलवींचे …

Read More »

ज्यांनी बाळासाहेबांना सोडले, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये : संजय राऊत यांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : ज्यांनी बाळासाहेबांना सोडले त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोग्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. बाळासाहेबांचा हिंदुत्वाबाबतचा जुना व्हिडीओ राज ठाकरे यांनी ट्विट केला होता. बाळासाहेबांच्या भाषणाचे कॅसेट्स पाठवू त्या पहा. सर्व भोंगे बंद करा असे …

Read More »

अखेर राणा दाम्पत्याला दिलासा, सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह धरणे. त्याचबरोबर चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. यायालयाने राणा …

Read More »

नागनवाडीच्या प्रा. डॉ. गोपाळ गावडे यांचे अस्सल चंदगडी भाषेतील ‘उंबळट ‘ व्यक्तिचित्रण प्रकाशनाच्या उंबरठ्यावर

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : ‘उंबळट’ हे प्रा. डॉ. गोपाळ ओमाणा गावडे (नागनवाडी, ता. चंदगड) यांनी लिहिलेल्या व्यक्तीचित्रणांचं पुस्तक स्वच्छंद प्रकाशन, कोल्हापूर यांच्याकडून लवकरच प्रकाशित होत आहे. चंदगडी भाषेला मराठीची बोलीभाषा म्हणून दर्जा मिळाला आहे. चंदगडीमध्ये ललित लेखन होऊ लागलेले आहे. परंतु पुस्तक रूपाने प्रकाशित होणारे ‘उंबळट’ हे पहिले व्यक्तीचित्रण …

Read More »