Sunday , September 8 2024
Breaking News

महाराष्ट्र

शिवरायांच्या मावळ्यांप्रमाणे लढून “देशासाठी गोल्ड मेडल मिळवणारच!” : ऑलिम्पिक नेमबाज स्वप्निल कुसाळे

ऑलिम्पिक दर्जाची शुटींग रेंज कोल्हापुरात तयार होण्यासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ चांदीची गदा व मानपत्र देऊन दसरा चौकात भव्य सत्कार कोल्हापूर : शिव, शाहूंच्या या महाराष्ट्राच्या मातीत जे घडतात ते देशाचं नाव गाजवतातच! शिवाजी महाराजांचे मावळे जसे महाराजांसाठी लढत असत त्याचप्रमाणे खेळात उत्तम कामगिरी करुन कोल्हापूरचे आणि आपल्या …

Read More »

ऑलिंपिक पदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसाळेचे कोल्हापुरात भव्य मिरवणुकीने जल्लोषी स्वागत

हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टीने वेधून घेतले लक्ष विद्यार्थी, युवा, अबालवृद्धांसह कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग कोल्हापूर : ढोल-ताशांचा गजर.. हलगीचा निनाद.. हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी.. मिरवणुक मार्गावरील रांगोळ्या, सजवलेल्या घोड्यावरुन पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला.. अशा प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक विजेता कोल्हापूरचा सुपुत्र नेमबाज स्वप्निल कुसाळे याचे कोल्हापुरात भव्य मिरवणुकीने स्वागत …

Read More »

गडहिंग्लज-वडरगे रोड साई कॉलनी तसेच नवनाथ मठी परिसरात बस थांबा गरजेचा; अन्यथा आंदोलन

  गडहिंग्लज : गडहिंग्लज-वडरगे रोड साई कॉलनी तसेच नवनाथ मठी परिसरात बस थांबा नसल्यामुळे पालकवर्गाची तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. गडहिंग्लज शहरालगत असलेल्या वडरगे रोड येथील पालकांनी तसेच गर्दे नगर, नवनाथ मठी रोड, मेंडुले वसाहत, के.डी. सी. कॉलनी या कॉलनीमधील रहिवासी नवनाथ मठी रोडच्या कॉर्नरवर पालक आणि विद्यार्थी शाळेच्या बसची …

Read More »

स्वप्नील कुसाळेचे जिल्ह्यात जोरदार स्वागत होण्यासाठी चोख नियोजन करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ

  ऑलिंपिक पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळेची बुधवारी कोल्हापुरात भव्य मिरवणूक कोल्हापूर : ऑलिंपिकमध्ये देशाचे नाव उंचावणारा कोल्हापूर जिल्ह्याचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याचे जिल्ह्यात जोरदार स्वागत होण्यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. पॅरीस येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशनमध्ये कांस्य पदक प्राप्त झाल्यानंतर …

Read More »

भाविकांची गैरसोय होऊ न देता जोतिबा विकास आराखड्याची कामे करा : राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

  लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाच्या सुशोभीकरणाची कामे महिन्याभरात पूर्ण करा कोल्हापूर : भाविकांची गैरसोय होऊ न देता जोतिबा विकास आराखड्याची कामे करा. ही कामे जलदगतीने करताना कामांचा दर्जा चांगला राहिल याची दक्षता घ्या, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. श्रीक्षेत्र जोतिबा विकास आराखडा व लोकनेते बाळासाहेब …

Read More »

दिवाळीनंतरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक

  नवी दिल्ली : लोकसभेनंतर राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात काही दिवसांत विधानसभा निवडणुकांची घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण महाराष्ट्रामध्ये दिवाळीनंतरच विधानसभेच्या निवडणुका होतील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात पाऊस झाला …

Read More »

कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत आढावा बैठक

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित स्थानिक नागरिक व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करुन जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर उपस्थित होते. यावेळी सेनापती …

Read More »

नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी लागणारा निधी वेळेतच देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

  केशवराव भोसले नाट्यगृहाची केली पाहणी कोल्हापूर : दुर्देवी घटनेत कोल्हापूर शहरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे अतोनात नुकसान झाले. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेला निधी वेळेअभावी न मिळाल्याने काम थांबले ही अडचण येवू देणार नाही, निधी वेळेतच देणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. …

Read More »

केशवराव भोसले नाट्यगृहासाठी शासनाकडून 20 कोटींची आर्थिक मदत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर

  ऐतिहासिक बाज कायम ठेवून पुर्वी होत तसं नाट्यगृह युद्ध पातळीवर पुन्हा उभारण्यात येणार असल्याची ग्वाही कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भक्कमपणे उभारलं होतं. हे नाट्यगृह कोल्हापुरातील ऐतिहासिक नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाशी कलाकार, रसिक आणि कोल्हापूरकरांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. या भावनांचा विचार करून …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम काळाच्या पडद्याआड

  मुंबई : अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज पहाटे मुंबईत निधन झालं आहे. विजय कदम गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते आणि त्यांनी त्यावर मात केली होती, मात्र त्यांचा कॅन्सर पुन्हा बळावला, त्यामुळे त्यांना पुन्हा मुंबईतील अंधेरी येथील रुग्णालयात दाखल …

Read More »