नवी दिल्ली : अल-कायदा या दहशतवादी संघटनेनं भारतामध्ये आत्मघाती दहशतवादी हल्ले करण्याची धमकी दिली आहे. अल-कायदा इन द सबकॉन्टीनंट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेनं गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्लीमध्ये आत्मघाती हल्ले करण्याचा इशारा दिलाय. प्रेषित मोहम्मद यांच्या सन्मानासाठी आम्ही स्वत:ला उडवून देण्यासाठी तयार आहोत, असं या दहशतवादी संघटनेनं म्हटलंय. भाजपाच्या …
Read More »मान्सून 6 दिवसांनी लांबला!
पुणे : राज्यात सध्या सगळेचजण मान्सूनच्या प्रतिक्षेत आहेत. पण मान्सूनचा प्रवाह अरबी समुद्रावर कमकुवत झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे भारताच्या काही भागांवर त्याची प्रगती आता जवळपास सहा दिवसांनी लांबली आहे, असं हवामान खात्याच्या उच्च अधिकार्यांनी सोमवारी सांगितलं. मान्सून कमकुवत झाल्याने, हंगामासाठी देशभरातील पाऊस 38% कमी होण्याची शक्यता असल्यची माहिती खचऊ ने …
Read More »हैदराबादमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; गोव्यात ब्रिटीश महिलेवर अत्याचार
हैद्राबाद : तेलंगाणाची राजधानी हैदराबाद येथील सामुहिक बलात्कार प्रकरण समोर येऊन नुकतेच काही दिवस झाले आहेत. त्यातच आता पुन्हा आणखी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक गुन्हा रामगोपालपेठ पोलीस ठाण्यात तर दुसरा गुन्हा राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. रामगोपालपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक सैदुलु यांनी …
Read More »उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून १५ प्रवासी ठार
देहरादून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे जाणारी बस दरीत काेसळून झालेल्या अपघातात १५ प्रवासी ठार झाले. अपघातस्थळी एसडीआरएफचे जवानांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले. या दुर्घटनेत १३ प्रवासी जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील रहिवाशांना घेवून बस उत्तरकाशीकडे निघाली हाेती. बसमध्ये २८ प्रवासी हाेते. बस दरीत काेसळली. स्थानिकांनी याची माहिती …
Read More »म्हणे, हनुमानाचे जन्मस्थळ ‘किष्किंधा’च; गोविंदानंद सरस्वती दाव्यावर ठाम
नाशिक : हनुमान जन्मस्थळावरून सुरू झालेला वाद दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. कर्नाटकातील किष्किंधा हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा गोविंदानंद सरस्वती यांनी बुधवारी (दि. 1) पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे हनुमान जन्मस्थळावरून निर्माण झालेले तणावाचे वातावरण कायम आहे. तर पोलिसांनी गोविंदानंद सरस्वती यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. मागील काही दिवसांपासून नाशिक …
Read More »मी मोदींचा छोटा शिपाई : हार्दिक पटेल यांचा भाजपमध्ये प्रवेश
अहमदाबाद : काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी आज (दि.२) भाजपमध्ये १५ हजार समर्थकांसह प्रवेश केला. मी पंतप्रधान मोदींचा छोटा शिपाई, अशी भावना हार्दिक पटेल यांनी पक्षप्रवेशानंतर व्यक्त केली. मी आजपासून एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशासाठी काम करेन, असे ट्विट त्यांनी केले आहे. …
Read More »नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीचे समन्स
नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड मनी लाँडरिंग प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी सक्तवसुली संचालनालयाने समन्स बजावले आहे. दोघांना ८ जूनला हजर राहण्यास सांगितले असल्याचे समजते. ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस दिली असल्याची माहिती काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी दिली …
Read More »धक्कादायक! प्रसिध्द पार्श्वगायक ‘केके’चा मृत्यू अनैसर्गिक,
नवी दिल्ली : प्रसिध्द पार्श्वगायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. पण समोर आलेल्या माहितीनुसार, केके याचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या नाही, तर अनैसर्गिक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे. केके यांच्या डोके, चेहरा आणि ओठावर जखमा आढळून आल्या असून, थोड्याच वेळात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे कळत …
Read More »नाशिकमध्ये साधूंचा राडा
नाशिक : किष्किंदाचे मठाधिपती गोविंदानंद स्वामी सरस्वती यांनी हनुमानाच्या जन्मस्थळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा विषय लावून धरला. यानंतर त्यांना त्र्यंबकेश्वरच्या ग्रामस्थांनी आणि साधूसंतांनी विरोध केला आहे. दरम्यान, या वादावर चर्चा करण्यासाठी आज शास्त्रार्थ सभा बोलावण्यात आली. त्यासाठी देशभरातील धर्म प्रतिनिधी नाशकात दाखल झाले आहेत. मात्र, यावेळी आसन व्यवस्थेवरून वादाला तोंड …
Read More »दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक
नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सत्येंद्र जैन यांची काही दिवसांपूर्वी ४ कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही अटक करण्यात आली असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे. सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजपचे नेते …
Read More »