Saturday , April 18 2026
Breaking News

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून १५ प्रवासी ठार

Spread the love

देहरादून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे जाणारी बस दरीत काेसळून झालेल्‍या अपघातात १५ प्रवासी ठार झाले. अपघातस्‍थळी एसडीआरएफचे जवानांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले. या दुर्घटनेत १३ प्रवासी जखमी झाले आहेत.
मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील रहिवाशांना घेवून बस उत्तरकाशीकडे निघाली हाेती. बसमध्‍ये २८ प्रवासी हाेते. बस दरीत काेसळली. स्‍थानिकांनी याची माहिती पाेलिसांना दिली. पाेलिसांसह एसडीआरएफच्‍या जवानांनी अपघातस्‍थळी धाव घेतली. बस २०० मीटर खोल दरीत काेसळल्‍याने १५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. एसडीआरएफचे जवानांनी जखमींना रुग्‍णालयात दाखल केले. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
हा अपघात दमतापासून नौगावच्या दिशेने दोन किमी अंतरावर झाला. या दुर्घटनेची माहिती मध्‍य प्रदेश सरकारच्‍या माध्‍यमातून मृतांच्‍या नातेवाईकांना देण्‍यात आली असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

खर्गे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आसाममध्ये तक्रार; अटकेची मागणी

Spread the love  बंगळूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्याविरोधात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *