Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूर तालुका समितीच्या अध्यक्षपदी गोपाळराव देसाई यांची निवड

Spread the love

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नूतन अध्यक्षपदी गोपाळराव देसाई यांची एकमताने निवड झाली. यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व कार्यकारिणीचे सदस्य, समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. समितीचे ज्येष्ठ नेते सूर्याजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. सुरेश देसाई यांनी गोपाळ देसाई यांचे नाव अध्यक्ष पदासाठी सुचवले त्याला अनुमोदन बळीराम पाटील यांनी दिले. मावळते अध्यक्ष देवापन्ना गुरव यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष गोपाळराव देसाई यांना मालार्पण करण्यात आले. नूतन अध्यक्षांच्या भविष्यातील कार्याबद्दल तसेच मावळत्या अध्यक्षांच्या कार्याबद्दल समितीचे नेते गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, पी. एच. पाटील, निरंजन सरदेसाई, सुरेशराव देसाई तसेच या बैठकीचे अध्यक्ष सूर्याजी पाटील यांची कौतुक करणारी भाषणे झाली. यावेळी समितीचे बळीराम पाटील, अजित पाटील, दत्तू कुट्रे, रणजीत पाटील, खेमानी घाडी, कृष्णा गुरव, रवी पाटील, विनायक सावंत, राजू पाटील व युवा समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *