Saturday , June 14 2025
Breaking News

भाजपा सरकारला ‘हिंदू दहशतवादी’ म्हणत अल-कायदाची भारतात आत्मघातकी हल्ल्यांची धमकी; दिल्ली, मुंबईचाही केला उल्लेख

Spread the love

नवी दिल्ली : अल-कायदा या दहशतवादी संघटनेनं भारतामध्ये आत्मघाती दहशतवादी हल्ले करण्याची धमकी दिली आहे. अल-कायदा इन द सबकॉन्टीनंट (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेनं गुजरात, उत्तर प्रदेश, मुंबई आणि दिल्लीमध्ये आत्मघाती हल्ले करण्याचा इशारा दिलाय. प्रेषित मोहम्मद यांच्या सन्मानासाठी आम्ही स्वत:ला उडवून देण्यासाठी तयार आहोत, असं या दहशतवादी संघटनेनं म्हटलंय.
भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांचा अवमान करणारं वक्तव्य केल्याच्यासंदर्भातून हा इशारा देण्यात आलाय. संघटनेनं जारी केलेल्या पत्रकामध्ये ‘भगवे दहशतवादी’ असा उल्लेख करत भारतीयांनी दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये होणाऱ्या हल्ल्यासाठी तयार रहावे असा इशारा देण्यात आलाय. त्यांना ना त्यांच्या घरात आश्रय मिळणार, ना त्यांच्या सैन्य छावण्यांमध्ये असा उल्लेख करत आत्मघाती हल्ला करणार असल्याचा इशारा या संघटनेनं दिलाय.
“जे आपल्या प्रेषितांचा अपमान करतात आपण त्यांना ठार मारलं पाहिजे. जे आपल्या प्रेषितांबद्दल अपशब्द वापरतात त्यांना उडवून लावण्यासाठी आपण स्वत:बरोबरच स्वत:च्या मुलांच्या अंगावरही स्फोटके बांधून हल्ला केला पाहिजे. त्यांना यासाठी कोणतीही माफी मिळणार नाही, कोणतीही शांतता आणि सुरक्षा त्यांना वाचवू शकणार नाही. हे प्रकरण निंदा किंवा दुःखाच्या कोणत्याही शब्दांनी शांत होणारं नाहीय,” असंही या संघटनेनं पत्रकात म्हटलंय.

About Belgaum Varta

Check Also

विमान थेट हॉस्टेलच्या इमारतीवर आदळले; 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू?

Spread the love  अहमदाबाद : विमान अपघाताची एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *