Thursday , September 19 2024
Breaking News

मुख्य बातमी

केरळमध्ये लॉकडाऊन; 66 टक्के जनता कोरोनाबाधित

तिरुअनंतपुरम (बेळगाव वार्ता) : मागील 24 तासांत विक्रमी कोरोना रुग्ण आढळल्याने केरळ सरकारने राज्यात पूर्ण लॉकडाऊन घोषित केला आहे. राज्यात दोन दिवस कडकडीत लॉकडाऊन असेल. केरळमध्ये मंगळवारी एका दिवसात 22 हजार रुग्ण आढळले. हे देशभरात आढलेल्या एकूण रुग्णांच्या 50 टक्के आहेत. त्यामुळे येथे चिंता वाढली आहे. केरळ सरकारने बकरी ईद …

Read More »

बाराबंकीमध्ये बसला मोठा अपघात, १८ ठार

लखनौ : उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे भीषण अपघात झाला. ट्रकने डबल डेकर बसला दिलेल्या धडकेत १८ जणांचा मृत्यू झाला. रामस्नेहीघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीत लखनौ-अयोध्या राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली.या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला, तर १९ लोक जखमी झाले. सर्व जखमींना उत्तर प्रदेशमधील लखनौ ट्रॉमा सेंटर येथे हलविण्यात आले आहे. …

Read More »

जम्मू-काश्मीर: बारामुल्लात चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या बारामूला जिल्ह्यातील सोपोरच्या वारपोरा गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तयब्याचे अतिरेकी होते. पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली. मरणाऱ्यामध्ये एका टॉप कमांडरचा समावेश आहे. सुरक्षा बलांना घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा सापडला आहे. तसेच अनेक आक्षेपार्ह वस्तू …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र बुधवारी …

Read More »

मराठा आरक्षण मिळवता येऊ शकते, पण केंद्राला महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी लागेल : संभाजीराजे

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली फेरविचार याचिका न्यायालयाने काल (दि.०१) फेटाळली. आरक्षणाबाबतचे अधिकार राज्याला आहेत, असा दावा केंद्र सरकारने याचिकेद्वारे केला होता. तोच न्यायालयाने फेटाळला आहे. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी, आता केंद्राची भूमिका महत्वाची असल्याचे म्हटले आहे. संभाजीराजे पुढे म्हणाले, की मराठा समाजाला राज्यपाल …

Read More »

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरही ८४ रुपयांनी भडकले

नवी दिल्‍ली : महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्‍य जनतेला सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका दिला. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कंपन्यांनी २५.५० रुपयांची वाढ केली. दुसरीकडे १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरही ८४ रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीतील घरगुती सिलिंडरचे …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची मोदी मंत्रिमंडळात वर्णी?, पंकजा मुंडे यांचीही चर्चा

पुढील आठवड्यात कॅबिनेटचा विस्तार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पुढच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महाराष्ट्रातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांना स्थान दिले जाणार असल्याची चर्चा भाजप मुख्यालयात रंगली आहे. फडणवीस यांच्याकडे रेल्वे किंवा उर्जा मंत्रालयाचा कारभार सोपवला जाण्याची …

Read More »

आणीबाणीचे काळे दिवस कधीही विसरले जाऊ शकत नाहीत : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू केली होती. त्या घटनेस 46 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘काळे दिवस कधीही विसरले जाऊ शकत नाहीत’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. इतिहासातील आणीबाणीच्या घटनेकडे मागे वळून …

Read More »

झारखंड : कळपातून काढून टाकलेल्या हत्तीने १४ जणांना केले ठार

नवी दिल्ली : झारखंडमध्ये मागच्या महिन्यात जवळजवळ १४ नागरिकांना एका हत्तीने ठार केले आहे. या हत्तीने त्यांच्या कळपात चुकीची वर्तुणूक केल्याने त्याला बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. वन्य अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा केला आहे. २२ हत्तींच्या कळपातील १५ वर्षांच्या या हत्तीने गैरवर्तन केल्याने कळपातून बाहेर काढले होते. हत्ती कळपातून बाहेर गेल्यापासून …

Read More »

दहा दिवसांत बारावीच्या मूल्यांकनाची माहिती सादर करा!

सर्वोच्च न्यायालयाचे शाळा मंडळांना निर्देश नवी दिल्ली : येत्या दहा दिवसांत देशातील सर्व शिक्षण मंडळांनी बारावीच्या मूल्यांकनाची माहिती सादर करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. याशिवाय 31 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करण्याचा आदेशही न्यायालयाने शिक्षण मंडळांना दिला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईसह देशभरातील विविध शिक्षण मंडळांनी बारावीच्या परीक्षा रद्द …

Read More »