Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर

19 मार्चच्या दुग्धाभिषेक कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी व्हा; खानापूर तालुका समितीचे आवाहन

  खानापूर : रविवार दि. 19 मार्च रोजी राजहंडगडावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व महाप्रसादाचा कार्यक्रम म. ए. समिती व स्वाभिमानी शिवप्रेमीच्या सहकार्याने होणार असून सदर कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने करण्यात आले आहे. महाप्रसादाच्या नियोजनामध्ये सुद्धा खानापूर तालुक्यातील समस्त शिवप्रेमीनी सढळहस्ते …

Read More »

जटगे गावातील हनुमान मुर्तीच्या मिरवणूकीला उत्साहात सुरूवात

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जटगे गावात नव्याने उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिरात पुजण्यात येणाऱ्या नुतन हनुमान मंदिर मिरवणूक रविवारी दि. १२ रोजी ढोल ताशाच्या गजरात व भंडाऱ्याची उधळण करत गावातील चव्हाटा देवस्थान पासुन सकाळी १० वाजता गावच्या पंचाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. जटगे (ता. खानापूर) गावात सकाळपासून घरासमोर रंगीत रांगोळ्या …

Read More »

देवलत्ती येथे डॉ. सोनाली सरनोबत यांचा सत्कार

  खानापूर : देवलत्ती (ता. खानापूर) येथील वीज समस्या निकाली लावण्यात भाजप ग्रामीण महिला उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी यश मिळवले. यानिमित्त देवलत्तीवासीयांनी त्यांचा नागरी सत्कार केला. डॉ. सरनोबत त्यांनी गावातील समस्या सोडवण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांबद्दल ग्रामस्थांनी प्रशंसा केली. डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या, गावातील कोणत्याही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी …

Read More »

डॉ. सोनाली सरनोबत आयोजित होळीला महिलांची उत्स्फूर्त दाद

    खानापूर : भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत तसेच देसी गर्ल्सतर्फे खानापूर येथे जल्लोषात होळी साजरी करण्यात आली. यावेळी हजारो युवती, महिलांनी सहभागी होऊन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रेन डान्स, पारंपरिक नृत्य, डीजे, अन्नोत्सव या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. डॉ. सोनाली सरनोबत यांनी उपस्थित महिला, युवतींसह नृत्याचा आनंद लुटला. …

Read More »

खानापूर मलप्रभा क्रीडांगणाला गेल्या पाच वर्षांत निधीच नाही; विकास होणार कुठून?

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रीडांगणाला माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या  प्रयत्नाने सुरूवात झाली. कोट्यावधी रूपयाचा निधी मंजूर करून मलप्रभा क्रीडांगण उभारण्यात आले. मात्र या क्रीडांगणाकडे कोणीही विकासाच्या दृष्टीने पाहिले नाही. आजी-माजी आमदारानी याकडे डोळेझाक केली. मात्र हेच लोकप्रतिनिधी मलप्रभा क्रीडागणावर मोठमोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करून …

Read More »

खानापूर तालुक्यातील गवत गंजीना आग लागण्याचा प्रकार सुरूच, रविवारी चापगावात गवत गंजीला आग

  खानापूर (प्रतिनिधी) : ऐन उन्हाळ्यात आग लागण्याचे प्रकार खानापूर तालुक्यात सुरूच आहेत. कधी काजूच्या बागेला आग लागल्याची घटना घडली. तर कधी जंगलाला आग लागून नुकसान झाले आहे. अशाच प्रकारे चापगावात (ता. खानापूर) येथे रविवारी दि. १२ रोजी भर दुपारी शेतातील घराच्या बाजुला असलेल्या गवत गंजीला आग लागून दोन ट्रॅक्टर …

Read More »

मुक्तांगण विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

  बेळगाव : “आजचा विद्यार्थी हा अतिशय भाग्यवान आहे, त्याला जीवनात जशा शिकण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत तशाच त्याला नोकरीचेही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळेमध्ये विकसित करण्यात आलेले ज्ञान, कौशल्य, नैतिक मूल्य आणि चांगल्या सवयी आयुष्यभर जोपासाव्यात” असे विचार जी एस एस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. …

Read More »

नंदगड येथील कन्या विद्यालयात दहावीच्या विद्यार्थिनीचा निरोप समारंभ संपन्न

  खानापूर : नंदगड येथील कन्या विद्यालयात दहावीच्या विद्यार्थिनीचा निरोप समारंभ व बक्षीस समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण गुरव होते .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अश्विनी पाटील, विठ्ठल पारिश्वाकर, काशिनाथ रेडेकर, मंजुनाथ केलवेकर उपस्थितीत होते. या कार्यक्रमामध्ये शाळेचे मुख्याध्यापक …

Read More »

खानापूर भाजपकडून डाॅक्टर, वकिलांशी समस्या निवारण बैठक

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजपतर्फे डाॅक्टर, वकिल यांच्याशी समस्या निवारण बैठक शनिवारी भाजप कार्यालयात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल होते. भाजपा निवडणूक प्रसारक श्री. वकुंड, बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर, राज्य महिला सचिव उज्वला बडवाणाचे, धनश्री सरदेसाई, वासंती बडिगेर, …

Read More »

जांबोटी उच्च प्राथमिक मराठी शाळेत जागतिक महिला दिन साजरा

  खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जांबोटी पी के पी एस सोसायटीच्या चेअरमन धनश्री सरदेसाई , के एस पी एस टी संघाचे कार्यदर्शी के एच कौंदलकर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुण्या म्हणून बीईओ राजश्री कुडची, पीईओ …

Read More »