Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर

खानापूर तालुका म. ए. समिती माजी अध्यक्ष विलास बेळगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णाना फळ वाटप

    खानापूर (प्रतिनिधी) : कुसमळी (ता. खानापूर) तसेच खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी अध्यक्ष, जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलास बेळगावकर यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शुक्रवारी दि. १० रोजी खानापूर सरकारी दवाखान्यातील रुग्णाना फळे वाटून करण्यात आला यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, म. ए. समितीचे अध्यक्ष …

Read More »

खानापूर समितीकडे गोपाळ पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  खानापूर : विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने इच्छुकांचे अर्ज सादर करण्यासाठी आवाहन केले आहे. यानुसार आज खानापूर विधानसभा मतदारसंघातून खानापूर म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते गोपाळ पाटील यांनी उमेदवारीसाठी अर्ज समितीकडे सादर केला आहे. अर्जदारांकडून ५१ हजार रुपये देणगीदाखल घेऊन म. ए. समिती अर्ज स्वीकारत आहे. गोपाळ पाटील …

Read More »

युवा नेते निरंजन सरदेसाई यांचा समितीकडे उमेदवारी अर्ज सादर

  खानापूर : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी म. ए. समितीचे युवा नेते निरंजन सरदेसाई यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निरंजन सरदेसाई यांनी आज आपल्या निवासस्थानी साहित्यिक म. ए. समितीचे नेते कै. उदयसिंह सरदेसाई यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आपल्या समर्थकांसह पदयात्रेने जाऊन आपला उमेदवारी अर्ज …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटी चेअरमनपदी विनोद पाटील

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी कमिटीचे चेअरमन प्रकाश बैलूरकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बुधवारी दि. 7 रोजी झालेल्या नगरपंचायतीच्या सर्व साधारण बैठकीत नुतन स्थायी कमिटीच्या चेअरमनपदी नविन नगरसेवकांना संधी देण्याबाबत चर्चा करण्यात आला. या सर्वानुमते विनोद पाटील यांच्या नावाची नगरसेवकातून चर्चा झाली. यावेळी स्थायी कमिटीच्या चेअरमन पदी विनोद पाटील …

Read More »

डॉ. सोनाली सरनोबत खानापूर तालुक्यातील महिलांचे प्रेरणास्थान!

  बेळगाव : विधानसभा निवडणुक अवघ्या कांही महिन्यावर येऊन ठेपली आहे. सर्व राष्ट्रीय पक्ष निवडणुकीसाठी रणनीती आखत आहेत. यात भाजप देखील आघाडीवर आहे. भाजप सरकार यंदाची निवडणूक “गुजरात पॅटर्न”वर लढविण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपाकडून जवळपास 60 ज्येष्ठ आमदारांना निरोपाचा नारळ देऊन नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा विचार सुरू असल्याची …

Read More »

खानापूरात उद्या जंगी कुस्ती मैदान

  खानापूर (प्रतिनिधी) : श्री साई कृष्ण प्रतिष्ठान खानापूर यांच्या वतीने उद्या शुक्रवारी दि. १२ रोजी बरगांव जवळील श्री साई मंगल कार्यालयाच्या आवारात दुपारी तीन वाजता जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रथम क्रमांकाची कुस्ती डब्बल कर्नाटक केसरी पै कार्तिक काटे विरूद्ध पै कमळजीत पंजाब, व्दितीय क्रमांकाची कुस्ती …

Read More »

खानापूर समितीतर्फे मराठी आणि सीमाप्रश्नी जनजागृती अभियान

  खानापूर : समितीच्या प्रवाहात मराठी भाषिकांना पुन्हा आणण्यासाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमाप्रश्न आणि मराठीसंदर्भात जनजागृती मोहीम राबविली. निवडणूक जवळ आली कि विविध प्रकारची आमिषे दाखवून राष्ट्रीय पक्ष मराठी भाषिकांना समितीपासून तोडण्याचे प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय पक्षांचा कुटील डाव वेळीच हाणून पाडण्यासाठी मराठी भाषिकांनी सजग राहावे, असे आवाहन तालुका …

Read More »

खानापूर नगरपंचायतीच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा

    खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नारायण मयेकर होते. बैठकीला स्थायी कमिटीचे चेअरमन प्रकाश बैलूरकर, चीफ ऑफिसर आर. के. वटार होते. प्रास्ताविक प्रेमानंद नाईक यांनी केले. यावेळी बैठकीत खानापूरशहराच्या एस सी एस टी स्मशानभूमीत विद्युत खांबाची सोय करण्याबाबत चर्चा …

Read More »

खानापूरात मुलींची थ्रो बॉल स्पर्धा; गव्हर्मेंट हायस्कूल खानापूरने पटकावला पहिला क्रमांक

  खानापूर : खानापूर येथे डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नियती फाउंडेशनच्या वतीने खानापूर येथे कित्तुर राणी चनम्मा ट्रॉफी मुलींच्या थ्रो बॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यासाठी मुलींचा व त्यांच्या पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या सामन्यामध्ये 16 मुलींचे संघ सहभागी झाले होते. नियती फाउंडेशनतर्फे विजेत्या संघाला 70001 रुपये, 5000 …

Read More »

डॉ. सोनाली सरनोबत यांनी केले कोळेकर कुटुंबीयाचे सांत्वन

  खानापूर : खानापूर तालुक्यातील कौंदल गावातील एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर येताच भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. महादेव सुभाष कोळेकर (17) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. लष्करात भरती न झाल्याने त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले. डॉ. सोनाली सरनोबत यावेळी बोलताना …

Read More »