खानापूर : खानापूरमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची मागणी करण्यात आली आहे. एक कोटी खर्चून विद्यार्थी वसतिगृह बांधण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. संपूर्ण इमारत नादुरुस्त झाली आहे. इमारती बाजूने असलेली भिंत देखील कोसळलेली आहे. त्यामुळे वसतिगृह म्हणजे दारुड्यांचे ठिकाण झाले आहे. तरीही इमारत परत एकदा …
Read More »घोटगाळीत श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा कळसारोहण
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील घोटगाळी येथे जवळपास 15 ते 18 लाख रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा कळसारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना गुरुवारी पार पडली. यावेळी मंदिराचा कळसारोहण भारतीय जनता पार्टीचे नेते व महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विठ्ठल हलगेकर यांनी …
Read More »खानापूरात एलआयसी “एजंट डे” उत्साहात साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील शुभम गार्डन हॉलमध्ये बेळगाव एलआयसी ऑफ इंडिया ब्रांच वन व सॅटलाईट ऑफिस खानापूर यांच्यावतीने एलआयसी “एजंट डे” उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सभेचे अध्यक्ष म्हणून एलआयसी एजंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून चंदगड येथील एम डी आर टी एजंट …
Read More »एम. के. हुबळी येथील विजय संकल्प यात्रेसाठी बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहावे ; भाजपा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांचे आवाहन
खानापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या 28 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता एम. के. हुबळी येथे विजय संकल्प यात्रेसाठी उपस्थित राहणार आहेत. खानापूर, कित्तूर, बैलहोंगल आदी भागातून बहुसंख्य नागरिकांनी अमित शहा यांच्या जाहीर सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत …
Read More »खानापूरात संगोळी रायन्नाच्या बलिदान दिनानिमित्त रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
खानापूर : खानापूर शहरात सालाबादप्रमाणे यंदाही खानापूर हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने भाजप युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिवीर संगोळी रायन्नाच्या बलिदान दिनानिमित्त गुरूवारी दि. २६ जानेवारी रोजी आयोजित भव्य बाईक रॅलीला युवकाचा भव्य प्रतिसाद लाभला. गुरूवारी सकाळी रॅलीचे सुरूवात खानापूर शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून करण्यात आली. प्रारंभी …
Read More »खानापूर मराठा मंडळ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी संतोषी गुरव पथसंचलनात
खानापूर : मराठा मंडळ कला आणि वाणिज्य महाविद्यालय खानापूर येथील 25 कर्नाटका बटालियन संचलित एनसीसी विभागाची कॅडेट कुमारी संतोषी शिवाजी गुरव ही विद्यार्थिनी प्रजासत्ताक दिनी चालणाऱ्या पथसंचलनात सहभागी झाली आहे. कुमारी संतोष हिने याआधी राज्य पातळीवर परिश्रम घेत असताना बेळगाव, धारवाड, बल्लारी, मंगलोर, बेंगलोर इत्यादी ठिकाणी जवळजवळ सहा …
Read More »गॅस सिलेंडर स्फोटातील आपद्ग्रस्तांना डॉ. सोनाली सरनोबत यांची मदत
खानापूर : खानापूर शहरालगत असलेल्या शिवाजीनगर येथील व्ही. एन. पाटील निवृत्त जवान यांच्या घरी घरगुती गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे स्फोट झाला व त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाटील कुटुंबियांची चौकशी …
Read More »खानापूर तालुक्यातील गोदोळी येथे जंगली हत्तींच्या कळपाचे दर्शन
खानापूर : बुधवारी सकाळी खानापूर तालुक्यातील गोदोळी येथे जंगली हत्तींच्या कळपाचे आगमन झाले असून त्यांनी शेतातील पिकाची मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे. सकाळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना जंगली हत्तींच्या कळपाचे दर्शन घडले. लगेच शेतकऱ्यांनी अन्य शेतकऱ्यांना आणि वन खात्याला हत्तीचा कळप आल्याची माहिती दिली. या कळपात चार हत्ती असून त्यामध्ये …
Read More »वारकऱ्यांसमवेत दिंडीमध्ये सामील डॉ. सोनाली सरनोबत
खानापूर : माघी एकादशीनिमित्त वारकरी पायी दिंडी घेऊन पंढरपूरला जात आहेत. खानापूर तालुक्यातून कालमणी व गोल्याळी येथून वारकरी पायी दिंडीने पंढरपूर येथे जात आहेत. पायी दिंडीत सामील झालेल्या वारकऱ्यांची भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी नुकताच भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या व दिंडीमध्ये सामील झालेल्या वारकऱ्यांचा डॉ. सरनोबत …
Read More »एम. के. हुबळी येथील सभेला भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा
खानापूर (प्रतिनिधी) : एम. के. हुबळी येथे येत्या दि. २८ रोजी भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला खानापूर तालुक्यातील जवळपास १५ हजार भाजपच्या कार्यकर्त्यानी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन राज्य प्रधान कार्यदर्शी महेश टिंगीनकाई यांनी खानापूर येथील शिवस्माकात भाजपच्या सभेत बोलताना केले. कार्यक्रमाच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta