Monday , September 21 2026
Breaking News

नंदगड येथील कन्या विद्यालयात दहावीच्या विद्यार्थिनीचा निरोप समारंभ संपन्न

Spread the love

 

खानापूर : नंदगड येथील कन्या विद्यालयात दहावीच्या विद्यार्थिनीचा निरोप समारंभ व बक्षीस समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण गुरव होते .या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अश्विनी पाटील, विठ्ठल पारिश्वाकर, काशिनाथ रेडेकर, मंजुनाथ केलवेकर उपस्थितीत होते. या कार्यक्रमामध्ये शाळेचे मुख्याध्यापक एस. एम. कदम यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींनी भाषणांमध्ये आपले मनोगत व्यक्त केले. तसेच खेळामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून एस. डी. पाटील, संभाजी हायस्कूल बेलूरचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. आय. पाटील यांनी केले तसेच आभार प्रदर्शन एस. व्ही. बेंचेकर यांनी केले. शाळा सुधारणा समितीचे सदस्य एम. आर. पाटील, सुदेश दलाल, सुनील जुंजवाडकर, रमाकांत पाटील, मारुती गुरव, मधुकर पाटील, सुहास पाटील, नेहा नाईक, दिक्षा बेळगावकर इत्यादी उपस्थितीत होते.

कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् गीताने करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *