Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर

खानापूर तालुका म. ए. समितीची महत्त्वपूर्ण बैठक 26 जानेवारीला

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक 26 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता शिवस्मारक खानापूर येथे बोलाविण्यात आली आहे. बैठकीत खालील विषयावर विचारविनिमय करण्यात येणार आहे. 1) संपूर्ण तालुक्यामध्ये गावोगावी फिरून संपर्क दौरा करून मराठी माणसाच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणेबाबत. 2) मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

गुंजी सीआरसी केंद्रात कलिका हब्ब उत्साहात

  खानापूर (प्रतिनिधी) : गुंजी (ता. खानापूर) सीआरसी केंद्रातील सर्व शाळांच्या वतीने इयत्ता चौथी ते नववी इयत्तेतील विद्यार्थ्याकरिता कलिका चेतरीकेचा एक भाग असलेला कार्यक्रम म्हणून कलिका हब्ब कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी गुंजी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा गुंजी येथे बुधवारी करण्यात आले. प्रारंभी गावातून दिंडी पालखी फिरवण्यात आली. त्याचबरोबर झांज पथक, …

Read More »

खानापूर जांबोटी क्राॅसवरील सीडीचे काम बीएसएनएल केबलमुळे विलंब

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील सीडीचे काम केवळ बीएसएनएलची केबल संबंधित खात्याने वेळीच न काढल्याने अर्धवट राहिले. याबाबतची माहिती अशी, यंदा जत जांबोटी मार्गाचे रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम २० कोटी रूपये खर्चून करण्यात आले. मात्र खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील सीडीचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. यासाठी …

Read More »

मराठा मंडळ महाविद्यालयात युथ सप्ताहाचा सांगता समारोह समारंभ संपन्न

  खानापूर : मराठा मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालय खानापूर व FOCTAG व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 19/01/2023 रोजी म. म. महाविद्यालयात युथ सप्ताहाचा सांगता समारोह समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. श्रीमती जे. के. बागेवाडी व प्रमुख अतिथी म्हणून खानापूर मधील नामांकित वकील श्री. विलास …

Read More »

रूमेवाडी येथे समुह संपन्मूल केंद्र होनकल अंतर्गत ‘अध्ययन महोत्सव’ अर्थात ‘कलिका हब्ब’ कार्यक्रमास सुरुवात

  खानापूर : कर्नाटक सरकारच्या वतीने कोरोनाच्या काळात मुलांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी अध्ययन पूर्णप्राप्ती योजना लागू करण्यात आली आहे. दिनांक 19-01-2023 ते 20-01-2023 या कालावधीत सरकारी मराठी प्राथमिक शाळा रुमेवाडी येथे समूह संपन्मूल केंद्र होनकल अंतर्गत 16 शाळांमधील निवडक 120 मुलांसाठी अध्ययन पूर्णप्राप्ती समाजासमोर उलगडण्यासाठी अध्ययन महोत्सवाचे आयोजन करण्यात …

Read More »

महिलाच सामाजिक व राजकीय बदल घडवू शकतात; डॉ. सोनाली सरनोबत

  खानापूर : महिलांनी त्यांचे हक्क व जबाबदाऱ्यांप्रति जागरूक असले पाहिजे. एक स्त्रीच चांगला समाज घडवू शकते. स्त्री ही अबला नसून ती सबला आहे. खानापूर तालुक्यात 54 टक्के महिला मतदार आहेत. समस्त महिला आपल्या हक्क व जबाबदरीप्रति जागरूक असतील तर महिला सामाजिक व राजकीय बदल घडवू शकतात, असे मत भाजपा …

Read More »

नंदगड येथे मालमत्तेच्या वादातून एकाची हत्या

  खानापूर : मालमत्तेच्या वादातून भाऊबंदांनी एकाची हत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी खानापूर तालुक्यातील नंदगड परिसरात घडली. यल्लाप्पा संताराम गुरव (वय 33 वर्षे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खानापूर तालुक्यातील नंदगड पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत येणाऱ्या बाळी कोडल गावच्या वेशीवरील एका घरात सदर खुनाचा प्रकार घडला आहे. मालमत्तेच्या वादातून …

Read More »

नियती फौंडेशच्या वतीने इटगी येथे हळदीकुंकू समारंभ

  खानापूर : महिलांना रोजच्या व्यावहारिक जीवनातून थोडा निवांतपणा मिळावा, विचारांची देवाणघेवाण करता यावी यासाठी हळदीकुंकूच्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतात. त्यासाठी हळदीकुंकूसारखे कार्यक्रम करणे गरजेचे आहे, असे भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या. नियती फौंडेशच्या वतीने मकरसंक्रांतीचे औचित्य साधून इटगी येथे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नियती फौंडेशनच्या …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन!

  खानापूर : वैयक्तिक हेवेदावे विसरून समितीला बळकटी देणे व आमिषाना बळी पडून राष्ट्रीय पक्षाकडे गेलेल्या तरुणाईला समितीच्या मुख्य प्रवाहात आणून सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवून घेणे हीच खरी हुतात्म्यांना श्रद्धांजली, असे मत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी हुतात्म्यांना अभिवादन करत व्यक्त केले. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

जटगे येथे रविवारी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेची जनजागृती

  खानापूर : जटगे ता खानापूर येथे रविवार दि. 22-1- 2023 रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धा होणार असून त्याकरिता जटगे परिसरातील कामतगे, शिंपेवाडी, भालके के एच भटवाडा, आदी शाळांना भेट देऊन तेथील एसडीएमसी कमिटी, नागरी अभियान कार्यकर्ता, महिला वर्ग यांना खेळाचे महत्व व मॅरेथॉन ला सहभागी होणे, याविषयी सविस्तर माहिती सांगून …

Read More »