Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर हेस्काॅमच्या कार्यालयात ग्राहक मेळावा संपन्न

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराजवळील शिवाजी नगरात दत्ताराम गावडे यांच्या घराच्या गेटजवळ विद्युत खांब्याच्या आधारासाठी तार रोवली आहे. त्यामुळे वाहन घेऊन जाण्यास अडचण भासत आहे ती तार काढावी, अशी मागणी करण्यात आली.
जयराम पाटील यांच्या शेतात गेल्या दोन वर्षांपासुन दोन विद्युत खांबे पडले आहेत ते बदलावे अशी मागणी केली आहे. मात्र अद्याप बदलेले नाही. नागुर्डा येथील शिवारात विद्युत खांब कोसळण्याच्या मार्गावर आहे, तो बदलावा. तसेच टी सी बसवावी, अशी नागुर्डा येथील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांनी मागणी केली. नंदगड येथील शिवारात विद्युत खांब उभारण्यात यावे, अशी मागणी नंदगड गावचे शेतकरी शिवाजी पाटील यांनी केली. याचबरोबर नंदगड गावच्या सुरेखा पाटील यांनी सर्वे नंबर १९३ मध्ये ३ एच पी पंप सेटसाठी अर्ज केला आहे. त्याची पुर्तता झाली नाही आदी समस्या नागरिकांनी हेस्काॅमच्या ग्राहक मेळाव्याच्या बैठकीत केल्या.
यावेळी ग्राहक मेळाव्याला बेळगाव जिल्हा हेस्काॅमचे कार्यकारी अभियंते प्रविण कुमार चिकाडे, खानापूर हेस्काॅमच्या अभियंत्या कल्पना तिरवीर, सहाय्यक अभियंते श्री रंगनाथ आदी उपस्थित होते.
यावेळी अभियंत्या कल्पना तिरवीर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी जिल्हा कार्यकारी अभियंते प्रविण कुमार चिकाडे यांनी समस्यांचे निवारण करून येत्या चार दिवसांत सर्व समस्या दूर करू असे आश्वासन दिले.

हेस्काॅमच्या ग्राहक मेळाव्याला तालुक्यातील शेतकरी, नागरिक, हेस्काॅमचे कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार अभियंते श्री रंगनाथ यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *