खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी कॉसवरील नव्याने बांधण्यात येणार्या बसस्थानकाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या विटा वापरण्यात येत असल्याने तालुक्याचे भूषण ठरणारे बसस्थानक कुचकामी ठरणार असल्याचे मत खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर बोलताना व्यक्त केले. नुकताच खानापूर शहरातील जांबोटी कॉसवरील नव्याने बांधण्यात येत असलेल्या बसस्थानकाच्या कामाची पाहणी …
Read More »कानशिनकोपात विद्युत तारेच्या स्पर्शाने बालकाचा मृत्यू
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील कानशिनकोपात घरासमोर पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कानशिनकोप येथील वरूण बसाप्पा कोलकार वय ६ वर्षे या बालकाचा घराच्या समोर विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. लागलीच खानापूर सरकारी दवाखान्यात उत्तरिय तपासणीस पाठवून सबंधित खात्याचे …
Read More »सीमाप्रश्न सुटेपर्यंत लढा जिवंत ठेवा : ज्येष्ठ सीमा सत्याग्रही शंकर पाटील
खानापूर : मराठी भाषा व संस्कृती टिकविण्यासाठी तसेच मागील 66 वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्यासाठी सीमावासीयांनी दिलेला लढा व्यर्थ जाऊ नये. यासाठी तालुक्यातील मराठी जनतेने समितीच्या झेंड्याखाली एकत्र या व राष्ट्रीय पक्षाच्या प्रलोभनांना बळी पडू नका. सीमालढा हा अनेकांच्या त्यागावर आणि बलिदानावर उभा आहे. सीमालढ्यासाठी अनेक हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे. याची …
Read More »मणतुर्गाजवळील रेल्वे गेटवरील पूलाच्या कामात पावसामुळे व्यत्यय; वाहतुकीस १० दिवस रस्ता बंद
खानापूर (प्रतिनिधी) : रेल्वे खात्याच्या वतीने खानापूर ते गुंजी पर्यंत रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आल्याने खानापूर हेम्माडगा महामार्गावरील वाहतूक सतत पडणाऱ्या पावसामुळे आणखीन १० बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर ते गुंजी दरम्यान रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने मणतुर्गा जवळ असलेल्या रेल्वे गेटवर …
Read More »जांबोटी क्राॅसवरील सीडीचे काम निकृष्ट दर्जाचे, पीडब्ल्यूडीचे दुर्लक्ष, नागरिकांचे हाल
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जत-जांबोटी रस्त्यावरील जांबोटी क्राॅसवरील बालकल्याण खात्याच्या कार्यालयासमोर बांधण्यात आलेल्या सीडीेचे काम निकृष्ट दर्जाचे होऊन महिना गेला तरी वाहतुकीस योग्य रस्ता न झाल्याने याकडे खानापूर पीडब्ल्यूडी खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या मयेकर नगर, विद्या नगरातील नागरिकांना रस्ता बंद झाल्याने नाहक त्रास सहन करावा …
Read More »मलप्रभा नदीवरील कुसमळी पुलाची श्रमदानातून डागडुजी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीवरील ब्रिटिश कालीन पुलाची गेल्या कित्येक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. पुलावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे बेळगाव- कुसमळी चोर्ला मार्गाने होणाऱ्या वाहतुकीला खुप मोठा अडथळा निर्माण होत आहे. याची जाणीव कुसमळी गावच्या भाजप युवा मोर्चा जनरल सेक्रेटरी पवन गायकवाड, अनंत सावंत पंचायत राज्य …
Read More »कारलग्यात घरावर झाड कोसळून नुकसान; माजी आमदार अरविंद पाटलांचे सहकार्य
खानापूर (प्रतिनिधी) : कारलगा (ता. खानापूर) येथील वामन बळवंत पाटील यांच्या राहत्या घरावर मुसळधार पावसामुळे सावरीचे झाड घरावर कोसळले. या घटनेची माहिती मिळताच खानापूर तालुक्याचे माजी आमदार आणि जिल्हा मध्यवर्ती बँक विद्यमान संचालक अरविंद पाटील यांनी रात्रीच्या वेळी कारलगा येथे मुसळधार पावसात उपस्थिती लावून मदत केली. त्यांनी लागलीच अधिकाऱ्यांना …
Read More »नंदगड ग्रा. पं. भ्रष्टाचार चौकशीच्या आंदोलनाला माजी ग्रा. पं. सदस्य गुंडू हलशीकराचा पाठींबा
खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील ग्रामपंचायतीमध्ये 65 लाख रुपयाचा अपहार झालेल्या आरोपाची जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्याने चौकशी करावी यासाठी नंदगड ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष मन्सूर तहसीलदारसह 21 सदस्यानी नंदगड ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली. गेल्या दोन महिन्यापासून नंदगड ग्रामपंचायतमध्ये 65 लाखाचा भ्रष्टाचार झाला आहे याची चौकशी व्हावी यासाठी ग्रामपंचायत …
Read More »सोमवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खानापूरात जाहीर सभा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील भाग्यलक्ष्मी सहकारी साखर कारखाना भागधारकांच्या व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्नाटक राज्य शिवसेना उपाध्यक्ष के. पी. पाटील, रयत संघटना तालुका अध्यक्ष महांतेश राऊत व उपाध्यक्ष अखीलसाब मुनवळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दि. २४ रोजी सकाळी ११ वाजता खानापूर येथील शिवस्मारकात जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. …
Read More »करंबळ गावच्या नितीन पाटील याचे शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये यश
खानापूर (प्रतिनिधी) : इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन ऑफ बेळगाव टीमचा खेळाडू व करंबळ (ता. खानापूर) गावचा सुपूत्र नितीन पाटील याने राज्य पातळीवर झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये खानापूर तालुक्याचे नाव उज्ज्वल करत तीन गोल्ड मेडल जिंकून खानापूरच्या नाव लौकिकात भर टाकली आहे. नुकताच सप्टेंबरमध्ये चित्रदुर्ग, हुईना, व शिमोगा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta