Monday , December 8 2025
Breaking News

खानापूर

हबनहट्टी स्वयंभू मारूती देवस्थानात जेडीएस पक्षाचा महिला मेळावा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका जेडीएस पक्षाचा जांबोटी विभाग महिला मेळावा हबनहट्टी येथील स्वयंभू मारूती देवस्थानाच्या परिसरात सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जेडीएसचे नेते व मलप्रभा साखर कारखान्याचे चेअरमन नासीर बागवान होते. यावेळी व्यासपीठावर जेडीएसचे जिल्हा उपाध्यक्ष लियाकत बिच्चणावर, तालुका ब्लॅक अध्यक्ष एम. एम. सावकार, बाळू पाटील, …

Read More »

मणतुर्गा, रुमेवाडी, असोगा येथे खानापूर समितीची जनजागृती

खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर तालुका, मराठी आपला बाणा मराठी आपली संस्कृती, मराठी आमचे अस्तित्व मराठी आमची ओळख. ही ओळखच पुसण्याचे काम राष्ट्रीय पक्षांकडून सुरू असताना मेंढरासारखे तुम्ही-आम्ही स्वस्त बसून होणार आहे का? ६० वर्षे समितीचे एकहाती नेतृत्व मान्य करून तालुक्याची धुरा समितीच्या हाती सोपविणारे तुमचे आमचे आई-वडील, आजी-आजोबा …

Read More »

नंदगड ड्यॅमची दुर्दैवी अवस्था

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) गावाच्या पश्चिमेस असलेल्या धरणाची अवस्था फार बिकट झालेली आहे. सदर धरण हे माजी आ. कै. बसपान्ना आरगावी यांनी नंदगड गावाच्या शेतकऱ्याच्या शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी बांधले होते. या नंतर नंदगड धरणाचा आणि म्हणावा तसा गावाचा विकास झालेला नाही. आजपर्यंत कुठल्यापन लोकप्रतिनिधींनी धरणाचा विकासाबद्दल विचार …

Read More »

करंबळ येथे खानापूर म. ए. समितीची जनजागृती

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचा जागर करण्यासाठी तसेच मराठी भाषिकांची अस्मिता ज्वलंत करण्यासाठी संपूर्ण तालुक्यात तुकाराम गाथा व ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी काल रविवार दि. 16 ऑक्टोबर रोजी करंबळ येथे जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. करंबळ येथील …

Read More »

बेळगाव मित्र मंडळ पुणे यांचा वधूवर मेळावा संपन्न

  बेळगाव (प्रतिनिधी) : शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात नोकरी, व्यवसाय – उद्योगानिमित्त स्थायिक झालेल्या बेळगावकरांना कौशल्याने एकत्र आणून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी श्री.नारायण महादेव रामजी यांनी गेल्या 32 वर्षांपूर्वी बेळगाव मित्र मंडळ ट्रस्ट,पुणे ची स्थापना केली. या ट्रस्टच्या माध्यमातून श्री. नारायण रामजी पुणे स्थित बेळगावकरांसाठी पुणे शहरात विविध सामाजिक उपक्रम …

Read More »

सरकारी भु-अतिक्रमित जमिनी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी लढा कायम देऊ : बाबूराव देसाई

  खानापूर तालुक्यातील अतिक्रमित जमिन धारक शेतकऱ्यांना मार्गदर्शन खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जवळपास ५००० एकर जमिनी रेव्हनू पड जमिनी, फाॅरेस्टे खात्याच्या जमिनी, गायरान जमिनी, हंगामी लागवड म्हणजे एच एल जमिनी, अशा जमिनी शेतकरी कसत आहेत. त्या जमिनीचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा. यासाठी तालुका सरकारी भू-अतिक्रमित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सरकार विरोधात …

Read More »

नंदगड ग्राम पंचायतचा गैर कारभार चव्हाट्यावर

  खानापूर (प्रतिनिधी) : भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेल्या स्वातंत्र्यवीर क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या अमर बलिदानाने पावन झालेल्या या भूमीला पुण्यभूमी म्हणून उल्लेख केला जातो. भारत देशामध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता म्हणून ग्राम पंचायतीचा उल्लेख आवर्जून केला जातो परंतु या ग्राम पंचायतीचा भ्रष्टाचाराचा कारनामा काही महिन्यांतच जनतेसमोर आला आहे. शनिवार दि. …

Read More »

कुप्पटगिरी शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा बारावा वर्धापनदिन उद्या

  खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता.खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित कुप्पटगिरी क्राॅसजवळील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा बारावा वर्धापनदिन सोमवारी दि. १७ रोजी २ वाजता होणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक विठ्ठल हलगेकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शांतिनिकेत पब्लिक स्कूलचे चेअरमन प्रा. भरत तोपिनकट्टी, शांतिनिकेतन काॅलेजचे चेअरमन …

Read More »

कोडचवाड येथे श्री 108 परसमसागर मुनी महाराज चातुर्मास कार्यक्रम

  खानापूर : खानापूर तालुक्यातील कोडचवाड येथे श्री 108 परसमसागर मुनी महाराज चातुर्मास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात आज खानापूर तालुका महिला मोर्चा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांनी सहभाग दर्शविला. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, जैन धर्मातून अहिंसा परमोधर्माची शिकवण मिळते. अहिंसा परमोधर्माची समाजाला नितांत गरज …

Read More »

जांबोटी क्राॅसवरील सीडीचे काम पूर्ण होऊनही पीडब्ल्यूडीचे दुर्लक्ष, नागरिकांचे हाल

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जत-जांबोटी रस्त्यावरील जांबोटी क्राॅसवरील बालकल्याण खात्याच्या कार्यालयासमोर बांधण्यात आलेल्या सीडीेचे काम महिना होऊन गेला तरी याकडे खानापूर पीडब्ल्यूडी खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या मयेकर नगर, विद्या नगरातील नागरिकांना रस्ता बंद झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांतून नाराजी पसरली …

Read More »