खंडित वीजपुरवठ्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर तालुक्यातील नागरागाळी भागातील अनेक गावांत गेल्या 5 ऑगस्टपासून वादळी पावसामुळे विजेचा पुरवठा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे येथील परिसरात लोकांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यातील नागरगाळी, बामनकोप, कृष्णानगर, कुंभार्डा, तारवाड, कोडगई, सुवतवाडी, चिंचेवाडी, मुंडवाड, पिंपळे, मांजरपै, माचाळी, सतानाळी, …
Read More »नंदगड येथील क्रांतीवीर संगोळी रायण्णा समाधी परिसराची भाजपाच्यावतीने स्वच्छता
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील नंदगड येथील प्रसिद्ध क्रांतीवीर संगोळी रायण्णा समाधीचा परिसर खानापूर तालुका भाजप पक्षाच्यावतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्यसाधून स्वच्छ करण्यात आला. यावेळी समाधीच्या आवारातील पालापाचोळा, कचरा काढून टाकण्यात आला. फरशी झाडून पुसून स्वच्छ केली. क्रांतीवीर संगोळी रायण्णाच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर पुष्पहार अर्पण करून अभिवादन …
Read More »खानापूरात हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जनजागृतीची रॅली
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरात हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत दि. 13 ते 15 ऑगस्टपर्यंत घरोघरी तिरंगा फडकविण्यासाठी खानापूर शहरासह तालुक्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी मोटरसायकलवरून जनजागृती रॅलीचे नियोजन करण्यात आले. पणजी – बेळगांव महामार्गावरून शिवस्मारकातून रॅलीचे नियोजन करण्यात आले. यावेळी खानापूर तालुक्याचे दंडाधिकारी प्रविन जैन, नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर …
Read More »भिंत कोसळून महिला जखमी, बिदरभावीतील घटना
खानापूर (विनायक कुंभार) : तोपिनकट्टी ग्रा. पं. क्षेत्रातील बिदरभावी येथे घराची भिंत कोसळून महिला गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि. 12 रोजी सकाळी 10 च्या सुमारास घडली. लक्ष्मी विनोद पाटील असे जखमी महिलेचे नाव आहे. लक्ष्मी या सकाळी स्वयंपाक करत असताना अचानक त्यांच्या अंगावर भिंत कोसळून त्या खाली सापडल्या. …
Read More »कुंभार्डाजवळ खासगी बस झाडावर आदळून तिघे जखमी
खानापूर : रामनगर-बेळगाव मार्गावरील कुंभार्डाजवळ खासगी बस झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात ड्रायव्हर आणि कंडक्टरसह एक प्रवासी जखमी झाले आहेत. बेंगळुरूहून गोव्याला जाणारी नागश्री ट्रॅव्हल्सची खासगी बस रस्त्याच्या कडेला जाऊन झाडावर कोसळली. रामनगर-बेळगाव मार्गावरील कुंभार्डाजवळ आज सकाळी 8.00 च्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात बस चालक आणि वाहकासह एक प्रवासी …
Read More »हालात्री नदीचा पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील नद्या, नाल्याना पाण्याचा प्रवाह वाढल्याने गेल्या दोन दिवसापासून खानापूर हेम्माडगा मार्गावरील हालात्री नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने शिरोली, शिरोलीवाडा, हेम्माडगा, डोगरगांव, नेरसा, अशोकनगर आदी भागातील जवळपास २५ खेड्याचा संपर्क खानापूर शहराशी तुटला त्यामुळे हायस्कूल, काॅलेजच्या विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत …
Read More »निट्टूर ग्राम पंचायतीचे पीडीओ व क्लार्क लाचप्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
खानापूर (प्रतिनिधी) : निट्टूर (ता. खानापूर) येथील ग्रामपंचायतीचे पीडीओ श्रीदेवी गुंडापूर व क्लार्क सिध्दापा नाईक यांच्यावर लाच प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या दोघावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. निट्टूर ग्राम पंचायतीच्या हद्दीतील प्रभूनगर (ता. खानापूर) येथील रामचंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. वारसा दाखल प्रकरणी गेल्या …
Read More »इदलहोंड ग्राम पंचायतीकडून सिंगीनकोप येथील कोसळलेल्या शाळा इमारतीची दखल
खानापूर (प्रतिनिधी) : इदलहोंड (ता. खानापूर ) येथील ग्राम पंचायतीचे पीडीओ श्री. देसाई, सिंगीनकोप गावचे ग्राम पंचायत सदस्य परशराम कुंभार, सदस्या सौ. माया कुंभार आदीनी नुकताच मुसळधार पावसामुळे सिंगीनकोप लोअर प्राथमिक मराठी शाळेची तीन वर्ग खोल्याची कौलारू इमारत कोसळून जमिनदोस्त झाली. याची दखल घेऊन लागलीच भेट देऊन पाहणी …
Read More »बेळगाव-चोर्ला महामार्गावर झाडे कोसळली; वाहतूक बंद
खानापूर : बेळगाव-चोर्ला पणजी महामार्गावर कालमनी गावाजवळ मोठी झाडे कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तास बंद पडली आहे. बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे बेळगाव-चोर्ला पणजी महामार्गावर कालमणी गावाजवळ एकाचवेळी दोन मोठी झाडे कोसळली. त्यामुळे बेळगाव-गोवा महामार्गावरील वाहतूक दोन तासांहून अधिक काळ ठप्प झाली आहे. परिणामी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा …
Read More »खानापूर विद्यानगरात “हर घर तिरंगा” राष्ट्रध्वजाचे वितरण
खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारी दि. १३ ते सोमवारी दि. १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरा घरात तिरंगा राष्ट्रध्वज फडकावावा. या उद्देशाने खानापूर नगरपंचायतींच्या वतीने विद्यानगरात तिरंगा राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक नारायण मयेकर, नगरपंचायतींचे अधिकारी प्रेमानंद नाईक, याच्याहस्ते तिरंगा राष्ट्रध्वजाचे वितरण आले. यावेळी प्रत्येक घरोघरी तिरंगा राष्ट्रध्वजाचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta