खानापूर : मध्यवर्तीशी संलग्न असलेल्या खानापूर तालुका समितीच्या बैठकीत त्या गटातील समिती नेत्यांनी एका वृत्तवाहिनीला एकीसंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. त्या प्रतिक्रियांसंदर्भात 15 ऑक्टोबर रोजी “बेळगाव वार्ता”ने माझी प्रतिक्रिया प्रसारीत केली. पण त्या माझ्या प्रतिक्रियेवर काही कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांद्वारे उलटसुलट चर्चा सुरू केली आणि एकी बारगळण्यासाठी दिगंबर पाटील गट जबाबदार आहे …
Read More »हत्तरगुंजीची चिमुकली भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत सहभागी
खानापूर : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खानापूर तालुक्यातील चिमुकलीचाही सहभाग लक्षवेधी ठरला. काल भारत जोडो यात्रेत खानापूरमधून हजारो कार्यकर्त्यांसह महिलाही सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये हत्तरगुंजी येथील सविता व गुंडू मयेकर यांची कन्या कु. तेजस्विनी गुंडू मयेकर ही देखील खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यासोबत सहभागी झाली होती. कालच्या भारत …
Read More »तालुक्यातील अतिक्रमित जमिनधारक शेतकर्यांना सोमवारी मार्गदर्शन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जवळपास 5000 एकर जमिनीपैकी रेव्हनूपड जमिनी फॉरेस्ट खात्याच्या जमिनी, गायरान जमिनी, हंगामी लागवड, एचएल जमिनी, अशा जमिनी शेतकरी कसत आहेत. त्या जमिनीचा शेतकर्यांना लाभ व्हावा. यासाठी तालुक्यात सरकारी भू अतिक्रमित शेतकरी संघटनेची 2004 साली स्थापना होऊन शेतकरी वर्गाच्या बाजुने सरकारी दरबारी लढा चालू आहे. …
Read More »“भारत जोडो” पदयात्रेत खानापूर तालुक्यातून हजारो कार्यकर्ते सामील : डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर
खानापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत सहभागी होण्यासाठी आज पहाटे 4 च्या सुमारास दोन हजार कार्यकर्ते बेल्लारीकडे बसने रवाना झाले. त्याचबरोबर खाजगी वाहनाने देखील काँग्रेस कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले आहेत. मा. आमदार अंजलीताई संपूर्ण कर्नाटकात राहुल गांधींच्या पदयात्रेत सहभागी आहेत. त्यात आज खानापुरातून हजारोंच्या …
Read More »तब्बल आठ महिन्यानंतर मिळालेले खानापूर तालुका पंचायतीचे ईओ अधिकारी अद्यापही गैरहजर
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिमागासलेला व दुर्गम तालुका म्हणून सर्वाना परिचित आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात नेहमीच अनेक समस्या भेडसावत असतात. अशा समस्यानी ग्रस्त असलेल्या खानापूर तालुक्याला गेल्या आठ महिन्यापासून तालुका पंचायत कार्यनिर्वाह अधिकारी (एईओ) पद रिक्त होते. त्यामुळे तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. …
Read More »गोपाळ देसाई गटाचे आरोप बिनबुडाचे : बाळासाहेब शेलार
खानापूर : 1 नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळण्यात यावा यासाठी खानापूर तालुक्यात जनजागृतीचे वारे दोन्ही गटातून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर लक्ष्मी मंदिर खानापूर येथे नुकतीच बैठक पार पडली. सदर बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. एकी करणे ही काळाची गरज आहे. या हेतूने मागील आठवड्यात दोन्ही गटाच्या प्रत्येकी पाच सदस्यांची …
Read More »हलशी ते गुंडपी रस्त्याची दयनीय अवस्था
खानापूर : हलशी ते गुंडपी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती हलशी-गुंडपी रस्त्याची झाली आहे. संबंधित खात्याकडे वारंवार मागणी करून देखील या रस्त्याची डागडुजी करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करत आहे. छत्रपती शिवाजी हायस्कूल हलशी ते सरकारी मराठी शाळा हलशीवाडी ते गुंडपी रस्त्याची दुरावस्था …
Read More »अबनाळी गावाला सीसी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम आणि जंगल भागातील शिरोली ग्राम पंचायत हद्दीतील अबनाळी गावाला माजी एमएलसी महांतेश कवटगीमठ यांनी आपल्या फंडातून अबनाळी गावासाठी सीसी रोड साठी निधी मंजूर केला. त्या कामाचा शुभारंभ गुरूवारी दि. १३ रोजी बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या शुभहस्ते कुदळ मारून करण्यात आला. यावेळी …
Read More »काळ्या दिनाच्या जागृतीसाठी खानापूर तालुक्यातील गावोगावी संपर्क दौरे
खानापूर (प्रतिनिधी) : १ नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळला जाण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर तालुक्यातील मराठी भाषिक गावातून गावोगावी दौरे काढून काळ्यादिनी मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित राहण्यासाठी लागलीच संपर्क दौऱ्याला प्रारंभ करू, असे मत माजी आमदार दिगंबर पाटील यांनी शिवस्मारक सभागृहात बोलाविलेल्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून …
Read More »भाषा वाचली तरच संस्कृती टिकेल : आबासाहेब दळवी
नागुर्डा येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम खानापूर : हल्ली गावागावात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. आपली संस्कृती टिकविण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालली आहे. पण भाषा वाचली तरच संस्कृती टिकेल, याची दखल प्रत्येकाने घेतली पाहिजे. येत्या काळात भाषा संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येऊन या लढ्याला पाठबळ द्यावे, असे आवाहन म.ए. समिती नेते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta