खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील माडीगुंजी येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेत सेवानिवृत्त कन्नड शिक्षक ए. एम. पत्तार यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष तानाजी गुंडू गोरल होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राजाराम देसाई, सीआरपी बी. ए. देसाई, ग्राम पंचायत सदस्या सौ. …
Read More »लिंगनमठ भागात वन्यप्राण्यांचा वावर
खानापूर (विनायक कुंभार) : लिंगनमठ भागात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यापरिसरात वन्यप्राणी नसतानाही प्राणी येत असल्याने शेतकऱ्यात चिंता पसरली आहे. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत. कुंचवाड, गोधोली, मस्केनट्टी, सोन्यानहट्टी या गावातील पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. भागात ऊस, मका, भात, …
Read More »सिंगीनकोप प्राथमिक मराठी शाळेची इमारत कोसळली
खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेची सन १९५७ साली बांधलेली कौलारू इमारत मुसळधार पावसामुळे कोसळली. गेल्या दोन महिन्यापासून जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये वर्ग चालविण्यास विरोध केल्याने पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग गावच्या समुदाय भवनात, तसेच जवळ असलेल्या कन्नड प्राथमिक शाळेत भरविण्यात येत आहेत. सिंगिनकोप लोअर प्राथमिक …
Read More »खानापूर विद्यानगरात निवृत्त शिक्षक पत्तार यांचा सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील विद्यानगरात गुंजी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक शाळेचे कन्नड शिक्षक ए. एम. पत्तार हे ४० वर्षाच्या प्रदीर्घ शिक्षकीसेवेतून निवृत्त झाल्यानिमित्त सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष निवृत्त मुख्याध्यापक ए. बी. मुरगोड होते. प्रारंभी राज्य नोकर संघटना कार्यदर्शी …
Read More »सिंगीनकोप शाळेत एसडीएमसी कमिटीचा सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी मुलाच्या शाळेत एसडीएमसी कमिटीचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी एसडीएमसी अध्यक्ष धोंडीबा कुंभार होते. यावेळी शिक्षण प्रेमी ग्राम पंचायत सदस्य परशराम कुंभार, सदस्या माया कुंभार, ओमाणा पाटील, मोहन कुंभार, नागेश पाटील बाळू पाटील चितामणी तिरकणावर, परशराम कुंभार …
Read More »खानापुरातील शिवाजी नगरला हवेत स्पीड ब्रेकर
खानापूर (विनायक कुंभार) : शहरा लगतच्या शिवाजी नगरातून खानापूर-जांबोटी रोड जातो. हा रस्ता नेहमी वर्दळीचा असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच संभाव्य धोके टाळण्यासाठी गतिरोधकांची मागणी होत आहे. महिनाभरात शिवजीनागरात तीन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. नगरात प्रवेश करताना रेल्वे बोगदा उतरताना उतार आहे. तर दुसऱ्या बाजूने …
Read More »हंदूर येथील घर कोसळून झाले दोन महिने पण नुकसानभरपाईसाठी महसूल खाते निद्रिस्त
खानापूर (विनायक कुंभार) : सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळलेल्या घराला महसूल विभागाकडून कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आली नाही. महसूल विभाग हे अतिसंवेदनशीलतेची भूमिका बजावत असते. त्याच्या विरोधात येथील महिलेने सरकारी अधिकाऱ्यांना भावनिक आवाहन करून पडझड झालेल्या घराचा पुन्हा एकदा पंचनामा करून घर देण्याची मागणी केली. केरवाड (ता.खानापूर) ग्रामपंचायत क्षेत्रातील …
Read More »बेळगाव शहर, तालुका, खानापूर तालुक्यातील शाळांना सुट्टी
बेळगाव : गेल्या तीन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे बेळगाव शहर तालुका आणि खानापूर तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांना व अंगणवाडी केंद्रांना सुट्टी देण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. बेळगाव जिल्हा माहिती खात्याला दिलेल्या प्रतिनिधी पत्रकात नितेश पाटील यांनी सोमवारी या शाळांना सुट्टीची घोषणा केली आहे. तीन दिवसापासून बेळगाव आणि खानापूर तालुक्यामध्ये …
Read More »खानापूर तालुक्यातील मराठी जनतेने आंदोलनास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
माजी आमदार दिगंबरराव पाटील यांचे आवाहन खानापूर (प्रतिनिधी) : भाषिक अल्पसंख्याक कायद्याची कर्नाटक सरकारकडून पायमल्ली होत आहे. याची जाणीव करून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने उद्या 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होणार आहे. या ठिय्या आंदोलनाला खानापूर तालुक्यातील मराठी जनतेने उपस्थित …
Read More »काटगाळी प्राथमिक शाळेचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
खानापूर : शिक्षण खात्यामार्फत घेण्यात आलेल्या विभागीय केंद्र पातळीवरील प्राथमिक शाळांच्या क्रीडा स्पर्धेत काटगाळी (ता. खानापूर) शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. हत्तरगुंजी प्राथमिक मराठी शाळेच्या मैदानात या स्पर्धा पार पडल्या. कबड्डी स्पर्धेत या शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक, अडथळा शर्यत धावणे दिया मोहिते हिने प्रथम क्रमांक, शिवम चौगुले याने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta