Monday , September 21 2026
Breaking News

वॉटरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Spread the love

 

खानापूर :  बिजगर्णी (माचीगड) ग्राम पंचायतचे वॉटरमन रामचंद्र राजाराम शिंदे (वय 42) यांना विजेचा झटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना 29 काल दुपारी बिजगर्णी (माचीगड) येथे घडली.

रामचंद्र हे गेल्या 8 वर्षांपासून पंचायतीमध्ये कार्यरत होते. नेहमी प्रमाणे काल सोमवार दि. 29 रोजी स. 11 च्या सुमारास पंपसेट सुरू करत असताना ही घटना घडली. त्या ठिकाणी वर्दळ कमी असल्याने इतरांना वेळाने समजले. लागलीच त्याना खानापूर येथे आणण्यात आले. परिस्थितीत गंभीर असल्याने त्यांना खानापूर येथून बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उपचारादरम्यान दुपारी दोनच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

रामचंद्र यांच्या पाश्चात्य पत्नी, मुलगा, मुलगी, वडील असा परिवार आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *