खानापूर : जांबोटी गावातील सामान्य जनतेचा कानोसा घेतला असता गावातील जनतेचा पाठींबा पीडीओ नागाप्पा बन्नी यांना आहे, असे संजय गावडे यांनी सांगितले. सध्या जांबोटी पंचायत पीडीओच्या विरूद्ध पंचायत सदस्यांनी आंदोलन छेडले आहे. परंतु गावातील सामान्य माणूस हा पीडीओच्या बाजूनी आहे, असे कॉंग्रेस कार्यकर्ते व जांबोटी भागातील प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व असलेले संजय …
Read More »२७ रोजीच्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी खानापूर समितीच्या वतीने नंदगड, जांबोटी भागात जनजागृती
खानापूर : मराठी कागदपत्रांसाठी २७ रोजी होणाऱ्या महामोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर यांच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. बुधवार दिनांक २२ जून २०२२ रोजी नंदगड बाजारपेठ येथे पंचक्रोशीतील हजारो मराठी भाषिकाना मोर्चात सहभागी होण्यासाठी पत्रके वाटण्यात आली. यावेळी सीमासत्यागृही म. ए. समितीचे माजी अध्यक्ष पुंडलीक चव्हाण …
Read More »नंदगड आठवडी बाजारात खानापूर तालुका म. ए. समितीकडून जनजागृती
खानापूर : सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठी मधून परिपत्रके मिळावीत सरकारी कार्यालय व बस वर बोर्ड मराठीमध्ये असावेत ही मागणी करण्यासाठी मध्यवर्ती समिती बेळगाव यांच्या नेतृत्वाखाली 27 जून रोजी निघणाऱ्या महामोर्चाची नंदगड गावामध्ये पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. आज बुधवार दिवशी आठवडी बाजार असल्यामुळे नंदगड परिसरातील जनता मोठ्या प्रमाणात जमली होती …
Read More »कणकुंबी, तळावडे शाळेत योग दिन साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : कणकुंबी (ता. खानापूर) येथील माऊली विद्यालयात तसेच तळावडे मराठी शाळेत राष्ट्रीय योग दिनाचे औचित्यसाधुन योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला खानापूर तालुका आम आदमीचे तालुका अध्यक्ष तसेच विश्व भारती क्रीडा संकुलन जांबोटी विभाग प्रमुख भैरू पाटील, अनिल देसाई एक्स आर्मी, विश्व भारती क्रीडा संकुलन खानापूर तालुका …
Read More »नंदगड येथील डीएमएस पदवीपूर्व महाविद्यालयात सम्रता लोहार प्रथम
खानापूर : नंदगड येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचालित डीएमएस पदवीपूर्व महाविद्यालयात बारावी परीक्षेत वाणिज्य शाखेची सम्रता लोहार हिने 550 (91.66%) प्रथम क्रमांक संपादित केला आहे. वैभवी केसरकर 546 (91%) गुण मिळवत द्वितीय क्रमांक संपादित केला आहे. स्वाती मदावळकर हिने 537 (89.50%) गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. कला …
Read More »खानापूर समितीकडून जांबोटी भागात जनजागृती
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय निघणार्या मोर्चा संदर्भात जांबोटी याठिकाणी पत्रके वाटण्यात आली व जांबोटी परिसरातील नागरिकांना या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने हजर राहण्याचे आवाहन केले. यावेळी श्री. निरंजन सरदेसाई, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, खानापूर महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी …
Read More »योगसाधना करून स्वस्थ आणि मस्त रहा : आ. अंजली निंबाळकर
खानापूर : खानापुरातील मलप्रभा क्रीडांगणावर आज आंतरराष्ट्रीय योगदिन भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. यावेळी आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी प्रत्येकाने योगसाधना करण्याचे आवाहन केले. खानापूर शहरातील मलप्रभा क्रीडांगणावर खानापूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे मंगळवारी सकाळी आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका प्रशासनाचे विविध अधिकारी, शिक्षक, शालेय विध्यार्थी आणि योगप्रेमींनी उपस्थित …
Read More »खानापूरातील 35 कोटींच्या रस्त्याना मंजुरी
खानापूर : खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रयत्नाने 35 कोटींच्या रस्त्याना मंजुरी मिळाली आहे. तर अजून 10 कोटींचे रस्ते ग्रामीण विकास खात्याकडून येत्या आठ ते दहा दिवसांत मंजूर करण्यात येणार आहेत. यामध्ये तालुक्यासाठी 20 कोटींचे पीडब्लूडी रस्ते व 5 कोटींचे पीआरइडीचे रस्ते असे एकूण 25 कोटी कर्नाटक सरकार कडून …
Read More »खानापूर समितीकडून शिरोली येथे 27 जूनच्या मोर्चाची जनजागृती
खानापूर : मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमधून मिळावीत सरकारी कारभाराची माहिती मराठीमधून उपलब्ध व्हावी यासाठी 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा निघणार आहे. या मोर्चाची जनजागृती खानापूर तालुक्यामध्ये करत असताना शिरोली या गावी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी पत्रके वाटून शिरोली गावातील नागरिकांना मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन …
Read More »खानापूर तालुका म. ए. समितीची उद्यापासून विभागवार जनजागृती
27 जूनचा मोर्चा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती (दिगंबर पाटील गट) बैठक आज 20 जून रोजी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिगंबरराव पाटील हे होते. प्रास्ताविक समितीचे ज्येष्ठ नेते आबासाहेब दळवी यांनी केले. यावेळी बैठकीचा उद्देश स्पष्ट करण्यात आला. मध्यवर्ती महाराष्ट्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta