Sunday , July 26 2026
Breaking News

खानापुरात बस अभावी नागरिकांचे हाल

Spread the love

 

खानापूर : खानापूर येथून सकाळच्या वेळी बेळगाव येथे महाविद्यालयीन व इतर शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जातात सकाळी सात ते नऊ या वेळेत बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. याबाबत येथील आगार प्रमुखांना वारंवार विनंती करण्यात आलेली आहे. मात्र आगार प्रमुख दुर्लक्ष करत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच विद्यार्थी गर्दी करून तसेच दारात लोंबकळत प्रवास करत आहेत.

सकाळच्या सत्रात सात ते नऊ या वेळेत दर पंधरा मिनिटांनी एक बस बेळगावला सोडणे गरजेचे आहे. तसेच ग्रामीण भागातून वस्तीच्या येणाऱ्या बस त्या थेट बेळगाव पर्यंत सोडल्यास खानापुरातील गर्दी कमी होणार आहे. याबाबत आगार प्रमुखानी तात्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *