Sunday , July 26 2026
Breaking News

नेसरगी पोलिसांकडून अन्नभाग्य योजनेचा तांदूळ जप्त

Spread the love

बेळगाव : नेसरगी पोलिसांनी अन्नभाग्य योजनेचा तांदूळ बेकायदेशीरपणे वाहून नेणारी एक गाडी पकडून मोठ्या प्रमाणात तांदूळ जप्त केला आहे. बोलेरो पिकअप वाहनातून बेकायदेशीर रेशनच्या तांदूळाची वाहतूक होत असल्याच्या खात्रीलायक माहितीवरून नेसरगी पोलीस आणि अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून तांदूळ जप्त केला. वाहनासह 76,076 रुपये किमतीचा 71 पोती तांदूळ जप्त करण्यात आला. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. सीपीआय कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. नेसरगी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *