Friday , November 22 2024
Breaking News

खानापूर

खानापूरात तालुका शिक्षक संघाच्यावतीने गुरूवंदना समारंभ संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ खानापूर तालुक्याच्या वतीने गुरूवंदना समारंभ कार्यक्रमाच्यावतीने शनिवारी निवृत्त शिक्षक, जिल्हा आदर्श शिक्षक, विविध संघटना च्यावतीने आदर्श पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचा सत्कार पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघाचे अध्यक्ष वाय एम पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका नोकर संघाचे अध्यक्ष बी एम येळ्ळूर, …

Read More »

शिक्षक समाज सुधारणेचा खरा मार्गदर्शक : आबासाहेब दळवी

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे आदर्श शिक्षकांचा सत्कार खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे खानापूर तालुक्यातील शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. नंदगड येथील आनंदगड महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नारायण मल्लाप्पा देसाई, गणेबैल प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदानंद पाटील, ढेकोळी प्राथमिक …

Read More »

जांबोटी-कणकुंबी-चोर्ला रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कणकुंबी (वार्ताहर) : बेळगाव-चोर्ला-पणजी रस्त्यांपैकी जांबोटी ते चोर्ला हद्दीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात या रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असून वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. गेल्या वर्ष भरापासून या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते …

Read More »

कणकुंबी आरोग्य केंद्रात अंगणवाडी केंद्रातर्फे पौष्टिक आहार अभियानाचे आयोजन

कणकुंबी (वार्ताहर) : खानापूर तालुका महिला आणि बाल कल्याण खाते, कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कणकुंबी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पौष्टिक आहार मासाचरण कणकुंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकतेच संपन्न झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्ष रमेश रामचंद्र खोरवी होते. यावेळी कणकुंबी केंद्रातील सतरा आणि जांबोटी उपकेंद्रातील …

Read More »

खानापूरात पीडब्ल्यूडी खात्याकडून गाळे काढले, आमदारांची सुचना डावलली

खानापूर (प्रतिनिधी) : जत-जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्रॉसवर गाळेधारकांनी वर्गणी काढून 51 गाळे आमदारांच्या सांगण्यावरून उभारण्यात आले होते. मात्र महिन्यातच गाळे काढण्यासाठी पीडब्ल्यूडी खात्याचे अधिकारी व त्यांचे सहाय्यक अभियंते सोमवारी जेसीबी घेऊन गाळे काढण्यासाठी आले. यावेळी भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर तसेच माजी आमदार अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली गाळेधारक पीडब्ल्यूडी …

Read More »

खानापूर युवा समितीकडून होणार शिक्षकांचा सत्कार

बेळगाव : जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक प्राप्त खानापूर तालुक्यातील शिक्षकांचा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे खानापूर शिवस्मारक येथे उद्या शनिवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी ठीक चार वाजता सत्कार आयोजित करण्यात आला आहे, नंदगड येथील आनंदगड महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नारायण मल्लाप्पा देसाई गणेबैल प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदानंद पाटील ढेकोळी …

Read More »

बेळगाव-खानापूर-रामनगर महामार्गावर लवकरच तिन्ही भाषेत फलक

खानापूर (वार्ता) : बेळगाव ते खानापूर आणि अनमोडपर्यंतच्या रस्त्यावर तिन्ही भाषेतील फलक लावण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक श्रीकांत पोतदार यांनी दिले आहे. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी पोतदार यांची भेट घेऊन खानापूर ते रामनगर रस्त्याचे काम आणि फलक …

Read More »

गर्लगुंजी लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धारासाठी धर्मस्थळ ग्राम अभिवृध्दी संस्थेकडून २ लाखाची देणगी सुपूर्द

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार करण्यात येत असल्याने श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृध्दी संस्थेच्या मुख्याधिकारी विरेंद्र हेगदे यांच्या सुचनेवरून गर्लगुंजी लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धारासाठी दोन लाख रूपयाचा धनादेश खानापूर श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृध्दी योजनेचे अधिकारी प्रदिप शेट्टी, संदिप नाईक, सदानंद आर यांच्याकडून श्री …

Read More »

जांबोटी -चोर्ला रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, अपघाताला आमंत्रण

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जांबोटीपासून चोर्लापर्यंतच्या महामार्गावर यंदाच्या मुसळधार पावसामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे जांबोटीपासून ते चोर्लापर्यंत जाणार्‍या दुचाकी, चारचाकी वाहनांना वाहन चालविणे तारेवरची कसरत होत आहे. अशातच खड्डा चुकविण्याच्या नादात अपघाताला निमंत्रण होत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहने चालविणे धोक्याचे झाले आहे. मागील वेळी माती टाकून खड्डे …

Read More »

तोपिनकट्टीत पौष्टीक आहार कार्यक्रम संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टीत (ता. खानापूर) येथे अंगणवाडी केंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सौजन्याने पौष्टिक आहार कार्यक्रम नुकताच पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर उपस्थित होते.तर कार्यक्रमाला ग्राम पंचायत अध्यक्षा गीता हलगेकर, उपाध्यक्ष मारूती गुरव, सर्व सदस्य, सीडीपीओ राममुर्ती, सुपरवायझर श्री. केरूर, श्रीमहालक्ष्मी सोसायटीचे गुंडू पाखरे आदी …

Read More »