खानापूर : 1 जून 1986 च्या कन्नड शक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे समितीप्रेमी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी केले. 30 मे रोजी झालेल्या खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत ते बोलत …
Read More »शिवस्वराज संघटनेतर्फे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन वजा इशारा…
खानापूर : खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला आवश्यक त्या खतांचा पुरवठा वेळेत आणि योग्य दरात करण्यात यावा यासाठी शिवस्वराज फाऊंडेशन आक्रमक. खानापूर तालुक्यात मान्सूनला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी व उसाला खते घालण्यासाठी घाई गडबड सुरू आहे. अशा काळात तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला आवश्यक असलेले खत उपलब्ध होत नसल्याने कामे खोळंबताना दिसत …
Read More »“आमची नदी आमचा हक्क” संघटनेच्यावतीने 3 जून रोजी मोर्चा
खानापूर : कळसा भांडूरा प्रकल्पामुळे पश्चिम घाटातील भीमगड अभयारण्य वनसंपदा तसेच जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून या प्रकल्पामुळे उत्तर कर्नाटकाला वाळवंटाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी सुमारे 1500 किलोमीटर वाहत जाते आणि समुद्राला मिळते. त्याचप्रमाणे म्हादाई, कळसा भांडूरा, अघनाशिनी या नद्या देखील नैसर्गिकरित्या समुद्राला जाऊन मिळतात. …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शुक्रवार दिनांक ३० मे २०२५ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी १ जून १९८६ रोजी कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या व सीमाप्रश्नासाठी आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक बोलावलेली आहे. तरी …
Read More »खानापूर तालुक्यातील जंगल, धबधब्यांच्या ठिकाणी प्रवेश बंदी
बेळगाव : पावसाळ्यात खानापूर तालुक्यातील वनक्षेत्रे आणि धबधब्यांना पर्यटकांना भेट देण्यास वन विभागाने कडक बंदी घातली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि वन्यजीवांना धोका असल्याने पर्यटक, विशेषतः तरुणाई सोशल मीडियावर रेलचेल करताना आढळल्यास गंभीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील निसर्गरम्य परिसर व धबधबे …
Read More »मुसळधार पावसामुळे बेळगाव-चोर्ला महामार्ग बंद; खानापूर- जांबोटी मार्गाने वाहतूक वळवली
खानापूर : खानापूर तालुक्यात पावसामुळे मलप्रभा नदीला पूर आला आहे. कणकुंबी येथे असलेल्या मलप्रभा नदीच्या उगमस्थानाजवळ, कुसमळी गावाजवळ एका नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी अचानक वाढली आणि बांधकामाधीन भागातील तात्पुरता मातीचा रस्ता पूर्णपणे खचून गेला. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. हा रस्ता जांबोटी …
Read More »खानापूर तालुक्यात उद्या वीजपुरवठा खंडित
खानापूर : खानापूर भागात उद्या दि. 20 मे रोजी 1 ते 6 दरम्यान वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. कर्नाटक वीज प्रसारण निगम लिमिटेड (केपीटीसीएल) च्या वतीने 110 के.व्ही. खानापूर उपकेंद्रामधून विद्युत पुरवठा होणारा लैला साखर कारखाना परिसर देवलत्ती, बिदरभावी, भंडरगाळी, गर्लगुंजी, तोपीनकट्टी, बरगाव, निडगल, दोड्डहोसुर, सन्नहोसूर, करंबळ, जळगा, कुप्पटगिरी, …
Read More »वनमंत्री व पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करून म्हादई नदीचे पाणी वळविणे थांबवावे
पर्यावरणी फाउंडेशनच्या वतीने निवेदन सादर खानापूर : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य व मलप्रभा नदीचे संवर्धन करण्यासाठी तसेच हुबळी, धारवाड, नवलगुंद रामदुर्ग तसेच गदग या भागाला पर्यायाने उत्तर कर्नाटकाचे वाळवंटीकरण होण्यापासून वाचविण्यासाठी म्हादाई नदीचे पाणी वळविणे त्वरित थांबवावे यासाठी वनमंत्री व पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशा आशयाचे निवेदन पर्यावरणी फाउंडेशनच्या वतीने …
Read More »करंबळ ग्राम पंचायतचे विद्यमान सदस्य, भाजपा कार्यकर्ते उदय भोसले यांचा अपघातात मृत्यू
खानापूर : कौंदल येथील सामाजिक कार्यकर्ते व करंबळ ग्राम पंचायतचे विद्यमान सदस्य व भाजपाचे कार्यकर्ते उदय भोसले (वय 42 वर्ष) यांच्या दुचाकीला अज्ञात कारचालकाने पाठीमागून धडक दिल्याने उदय भोसले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटना खानापूर – बेळगाव मार्गावरील देसूर येथील पुलावर घडली. तसेच त्यांच्यासोबत असलेले प्रशांत पाटील …
Read More »तळेवाडीतील विस्थापित कुटुंबांना मंत्र्यांच्या हस्ते 10 लाखांची मदत वाटप
खानापूर : भीमगड वन्यजीव अभयारण्यात येणाऱ्या तळेवाडी (ता. खानापूर) येथील २७ विस्थापित कुटुंबांनी स्वेच्छेने जंगलाबाहेर स्थलांतर करण्यास सहमती दिल्यानंतर आज (शनिवार, १७ मे) या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. हेमाडगा येथे झालेल्या या विशेष कार्यक्रमात वनमंत्री ईश्वर खंड्रे, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta