खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघात मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे बॅलेट पेपरवर मराठीतून नावे समावेश करावी तसेच माहिती आणि मतदार यादी मराठी भाषेतून उपलब्ध करून द्यावी अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कारवारच्या जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कारवार लोकसभा मतदार संघातील खानापूर, …
Read More »कारवार मतदासंघातून निरंजन सरदेसाई यांचा अर्ज दाखल
खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निरंजन सरदेसाई यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी अर्ज दाखल करण्यासाठी कारवार येथे मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत कारवार वासियांचे लक्ष वेधून घेतले. अर्ज दाखल करण्यासाठी रवाना …
Read More »डॉ. अंजलीताई निंबाळकर उद्या अर्ज भरणार!
खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर उद्या मंगळवार दि.16/04/224 रोजी सकाळी 10.30 वाजता कारवार जिल्हाधिकारी कार्यालयात शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून काँग्रेसकडून त्याची जोरदार तयारी सुरू करण्यात येत आहे. यावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. पहिल्यांदाच खानापूर तालुक्याला लोकसभेची …
Read More »खानापुर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
खानापुर : खानापुर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले आहे. प्रारंभी खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना सरदेसाई यांनी मराठी भाषिकांचे हक्क अबाधित राखणे हे सरकारचे …
Read More »डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना सारदहोळे, शिराळी, मावळी भागातून पाठिंबा
कुमठा : “ना खाऊंगा ना खाने दुंगा” म्हणत पंतप्रधान मोदींनी गरीब लोकांना रस्त्यावर आणलं. निवडणुका बॉण्डद्वारे पैसा मिळवून मोठा भ्रष्टाचार केला आहे. दिलेला शब्द पाळणारी काँग्रेस आणि खते बियाणांवर जीएसटी लावून शेतकऱ्यांना जेरीस आणणारे भाजप सरकार यांच्यापैकी आपले भविष्य कोणाच्या हातात सुरक्षित आहे याचा विचार जनता नक्कीच करेल. आजपर्यंत …
Read More »सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी निवडणूक लढविणे गरजेचे : बाळासाहेब शेलार
खानापूर : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक दिनांक 12 एप्रिल रोजी शिवस्मारक कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृह येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई हे होते. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पुढील नियोजन करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकारी सदस्य त्याचप्रमाणे कार्यकर्ते …
Read More »गर्लगुंजी, तोपिनकट्टी भागातून डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना भरघोस मताधिक्य देणार; प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी!
खानापूर : उत्तर कन्नड लोकसभा कमतदार संघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचा कोस्टल भागात जोरात प्रचार सुरू आहे. कारवार जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये विभाग व बैठकांचे नियोजन सुरू असून त्या भागातून मोठा पाठिंबा मिळत आहे. त्याच पद्धतीने खानापूर तालुक्यातून ही अनेक राजकीय व सामाजिक तसेच सहकार क्षेत्रातील मंडळींनी …
Read More »भाजप नेते विवेक हेब्बार यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना बळकटी
खानापूर : उत्तर कर्नाटक लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठे खिंडार पडले असून यल्लापुरचे आमदार शिवराम हेब्बार यांचे चिरंजीव व युवा नेते विवेक हेब्बार यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातील एकूण दहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. शिरशी, यल्लापूर या ठिकाणी काँग्रेसला …
Read More »समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारार्थ सदाशिवगड व कारवार भागात गाठीभेटी
खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी सदाशिवगड व कारवार भागातील विविध भागात नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे. खानापूर समितीचे कार्यकर्ते रणजीत पाटील, सुनील पाटील, अभिजित सरदेसाई, बाळकृष्ण पाटील आदिनी सदाशिवगड येथील कोंकण मराठा भवन येथे कोंकण मराठा समाजाचे सचिव उल्हास कदम, …
Read More »खानापूरच्या कार्यसम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना लोकसभेत पाठवा
खानापूर : कार्यसम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना त्यांच्या केलेल्या कार्याबद्दल व त्यांच्याकडे असलेल्या संघटित वृत्तीचा विचार करून पक्षाने त्यांना लोकसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तर वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच खानापूर तालुक्याला उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे मराठीचा बुलंद आवाज लोकसभेत पाठविण्याची संधी खानापूरवासियांना मिळाली …
Read More »