Tuesday , April 21 2026
Breaking News

खानापूर

ओलमणी शाळेतील दोन शिक्षकांचा आदर्श पुरस्काराने गौरव

  खानापूर : तालुक्यातील हायर प्रायमरी मराठी शाळा, ओलमणी येथील दोन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शाळेचे मुख्याध्यापक पी. आर. गुरव (रा. शिवाजीनगर, रामगुरवाडी) यांना श्री दत्त देवस्थान क्षेत्र, आडी-निपाणी यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. तर शाळेचे सहशिक्षक एस. टी. मेलगे …

Read More »

गुंजी येथे ढोल-ताशाच्या गजरात “गुंजीचा राजा”चे विसर्जन

  गुंजी (संदीप घाडी) : खानापूर तालुक्यातील गुंजी येथील सार्वजनिक गणेश “गुंजीचा राजा”ची मिरवणूक ढोल व ताशा अशा पारंपारिक वाद्याच्या गजरात उत्साहात संपन्न झाली. सार्वजनिक श्री गणेश युवक मंडळाचे अध्यक्ष वासुदेव नागो गोरल यांच्या नेतृत्ववाखाली दि. 27 ऑगष्ट रोजी ढोल, ताशा आणि ह.भ.प. महाराज यांच्या भजनाच्या गजरात गावात संवाद्य मिरवणूक …

Read More »

खानापूर तालुका आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त : श्री. पी. बी. अंबाजी!

  खानापूर : शिक्षक हा समाजाचा कणा असतो. अशा शिक्षकाच्या शैक्षणिक आयुष्यात अनेक चढ उतार येतात पण त्या चढ उतारातून देखील यशाची गुरुकिल्ली साधण्याची धडपड अनेक शिक्षकांच्यात असते. शिक्षकांना आपला विद्यार्थी एक उत्तम व चांगला घडावा हीच आकांक्षा असते. आपण जीवनात शिक्षक म्हणून काम करताना काय सार्थक केले याचा मागोवा …

Read More »

चापगाव ता. खानापूर येथील युवकाचा पुणे येथे अपघाती मृत्यू

  खानापूर : गेल्या काही वर्षापासून पुणे या ठिकाणी कामानिमित्त स्थायीक असलेल्या चापगाव ता. खानापूर येथील बळीराम यल्लाप्पा कदम यांचा शनिवारी रात्री कात्रज बोगद्याजवळ दुचाकीला अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी तातडीने पुणे सिल्वर बर्थ हॉस्पिटल नऱ्हे या ठिकाणी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच्यावर उपचार झाला नसल्याने रविवारी सायंकाळी 6 …

Read More »

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा मलप्रभा नदीत बुडून मृत्यू

खानापूर : अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी गेलेल्या एका 18 वर्षीय युवकाचा यडोगा (ता. खानापूर) येथील मलप्रभा नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज घडली. मृत युवकाचे नाव संजय उर्फ शुभम यल्लाप्पा कुपटेकर (वय 18 वर्ष, रा. यडोगा) असे असून तो आपल्या घरच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी चापगाव-यडोगा मार्गावरील मलप्रभा नदीपुलाजवळ …

Read More »

चोरीच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू; खानापूरातील घटना

खानापूर : मारहाणीमुळे युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना खानापूर तालुक्यातील माणिकवाडी गावात उघडकीस आली आहे. वेंकप्पा मल्लारी मयेकर (वय 18 वर्षे) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी रुमेवाडी येथील नागराज गुंडू बेडरे व विजय गुंडू बेडरे या दोघांवर खूनाचा गुन्हा नोंद झाला आहे. तक्रारदार मल्लारी विठ्ठल मयेकर …

Read More »

खानापूर तालुक्यात गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत महिना 12.82 कोटीचा लाभ! पंचहमी योजना समिती अध्यक्षांची माहिती

  खानापूर : खानापूर तालुका पंचायतीच्या सभागृहात आज मंगळवार दि. 2 सप्टेंबर 2025 रोजी गॅरंटी योजना समितीची मासिक बैठक संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पाच गॅरंटी योजनेचे तालुका अध्यक्ष श्री. सूर्यकांत कुलकर्णी होते. बैठकीत पाच गॅरंटी योजनेच्या अधिकाऱ्यांसह मान्यवर सदस्य उपस्थित होते. बैठकीदरम्यान विविध योजनांची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गृहलक्ष्मी …

Read More »

चापगांव ग्रामस्थांकडून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा

  खानापूर : चापगांव ता. खानापूर तालुक्यातील सकल मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. सिमा भागातील खानापूर तालुक्यातील चापगांव समस्त मराठा बांधव एकत्रित येवून मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी एकवटले. “कोण म्हणतय देत नाही घेतल्या शिवाय रहात नाही, मनोज जरांगे तुम आगे …

Read More »

मणतुर्गे येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा फरशी बसवणे समारंभ उत्साहात संपन्न…

  खानापूर : श्रीदेव रवळनाथ मंदिराचा फरशी बसवणे शुभारंभ शनिवार दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी मणतुर्गे येथे गावचे सुपुत्र श्री. अविनाश नारायण पाटील, उद्योजक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे वतनदार श्री. विजय प्रकाश पाटील निवृत्त लष्करी हवालदार होते. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत श्री. नामदेव गुंडु गुरव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ …

Read More »

जांबोटी- चोर्ला मार्गावर वाहतूक ठप्प!

  खानापूर : बेळगाव – पणजी व्हाया चोर्ला मार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक अवजड ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने दुसरी अवजड ओव्हरटेक करून जात असताना पलटी होऊन या मार्गावरील वाहतूक सोमवारी (आज दि. 1 सप्टेंबर) पहाटेपासून ठप्प झाली आहे. जांबोटी पासून काही अंतरावर कालमणी ते आमटे दरम्यान सदर वाहतूक ठप्प …

Read More »