Monday , June 22 2026
Breaking News

पावसापूर्वीच तालुक्यातील सर्व विद्युत दुरुस्ती कामे पूर्ण करा; यात्रा काळात वीज सुरळीत द्या

Spread the love

 

खानापूर : ऐन पावसाळ्यात बऱ्याच वेळा वीज दुरुस्ती कामासाठी काढली जाते आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी विद्युत ताराना लागणाऱ्या झाडाच्या फांद्या आणि इतर अडचणी च्या ठिकाणचे पार्ट बदलने ही सर्व कामे आताच आवरून घ्यावी, जेणेकरून पावसाळ्यात लोकांना अंधारात राहण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही तसेच गर्लगुंजी श्री माऊली देवी यात्रा काळात वीज सुरळीत ठेवा त्यासाठी कायमस्वरूपी लाइनमन गावात ठेवावा. अशा स्वरूपाचे निवेदन सहायक कार्यकारी अभियंता प्रविण बरगाळे याना देण्यात आले. गर्लगुंजी भागाचे पूर्वीचे सेक्शन ऑफिसर जावेद यानाच पूर्वीप्रमाणे गर्लगुंजी भागाची जबाबदारी द्यावी अशी ही विनंती यावेळी करण्यात आली.
या सर्व मागण्या मान्य करून उपाययोजना चालू करू असे हेस्कॉम सहायक कार्यकारी अभियंता यांनी सांगितले.
यावेळी ग्रामस्थ प्रसाद पाटील, विजय लोहार, परशराम बेळगावकर, सतीश बुरुड, रामचंद्र लोहार उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर येथे म. ए. समितीविरोधात प्रशासनाला निवेदन

Spread the love  खानापूर : २२ जून रोजी म. ए. समितीने आयोजित केलेल्या आंदोलनाला प्रशासनाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *