Monday , August 17 2026
Breaking News

खानापूर येथे म. ए. समितीविरोधात प्रशासनाला निवेदन

Spread the love

 

खानापूर : २२ जून रोजी म. ए. समितीने आयोजित केलेल्या आंदोलनाला प्रशासनाने परवानगी देऊ नये, या मागणीसाठी स्थानिक संघटनांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

कर्नाटक रक्षण वेदिकेच्या खानापूर तालुका घटकाच्या वतीने तहसीलदारांची भेट घेऊन हे निवेदन सुपूर्द करण्यात आले. २२ जून रोजी होणाऱ्या आंदोलनामुळे सीमाभागातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी आणि कोणत्याही अनुचित प्रकाराला वाव देऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी विठ्ठल हिंडलकर, बिष्टप्पा बनोशी, श्रीकांत पाटील, तम्मण्णा गवळीनाळी, रामचंद्र पाटील, सिद्धू कोलकार मडीवाळी, भूपण्णी रामनिंग पाटील आणि भीमसेन अगसर आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूरातील महामेळाव्यातील प्रक्षोभक भाषणाचा खटला निकाली; रामदास कदम, नितीन बानुगडे-पाटील निर्दोष

Spread the love  बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापुरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *