Monday , August 17 2026
Breaking News

अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना

Spread the love

मिनाक्षी पाटील; बोरगाव येथे स्वयंपाक गॅसचे वितरण

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सहकारत्न उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मार्च महिन्यात गॅसची कमतरता असल्याने मंजूर झालेल्या गॅस लाभार्थ्यांना वितरित करता आल्या नव्हत्या. आता गॅस उपलब्ध झाल्यानंतर उत्तम पाटील यांच्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी आज १७ गॅसचे वितरण करण्यात आले.
अरिहंत उद्योग समूहातर्फे आयोजित या कार्यक्रमात अरिहंत समूहाच्या सर्वेसर्वा मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना गॅस वितरण करण्यात आले.
याप्रसंगी विनयश्री पाटील,धनश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून यापूर्वीही हजारो महिलांना गॅस उपलब्ध करून देण्यात आल्या असून धुरमुक्त स्वयंपाकघराची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. महिलांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे आणि चुलीच्या धुरामुळे होणाऱ्या विविध आजारांपासून त्यांची सुटका व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रकाश मडिवाळ यांनी स्वागत केले.
मिनाक्षी पाटील म्हणाल्या, “अरिहंत‌ उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. युवा नेते उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज गरजू महिलांना गॅस देण्यात आले आहेत. महिलांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना धुरापासून होणाऱ्या दुष्परिणामांपासून वाचविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे सांगितले मीनाक्षी पाटील यांचा किल्लेदार कुटुंबीयातर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी स्नेहल किल्लेदार, ज्योती किल्लेदार, प्रियंका लंबे, जयश्री नवले, राकेश फिरगणावर, राजू पाटील, सुशांत किल्लेदार,अजित पाटील, प्रकाश मडीवाळ, बच्चन मडीवाळ, दर्शन पाटील, ओमकार महाजन यांच्यासह गॅसधारक महिला उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

अरिहंत सौहार्द संस्थेला १८.३२ कोटीचा नफा; अध्यक्ष अभिनंदन पाटील

Spread the love  बोरगाव अरिहंतची ३६ वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *