Monday , August 17 2026
Breaking News

कन्नडसक्तीविरोधी मोर्चाला येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचा पाठिंबा

Spread the love

 

बेळगाव : शनिवार दिनांक 20/6/2026 रोजी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक अध्यक्ष श्री. विलास घाडी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे कार्यालय श्री बालशिवाजी वाचनालय येळ्ळूर येथे पार पडली.

बैठकीमध्ये सोमवार दिनांक 22 जून 2026 रोजी मध्यवर्तीं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या कन्नड सक्तीविरोधी मोर्चाला एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला व मोठ्या संख्येने मोर्चात हजर राहण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीच्या प्रारंभी गावातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच समितीच्या बळकटीसाठी आणि पुढील वाटचालीसाठी लवकरात लवकर बैठक घेऊन रणनिती ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला.

श्री सतीश पाटील, भुजंग पाटील, प्रमोद पाटील, मनोहर घाडी यांनी कन्नड सक्तीविरोधी मोर्चाविषयी सविस्तर माहिती दिली व मार्गदर्शन केले. बैठकीला अध्यक्ष विलास घाडी, मनोहर पाटील, भुजंग पाटील, सतीश पाटील, प्रमोद पाटील, परशराम घाडी, हणमंत पाटील, तानाजी पाटील, मधु पाटील, निखिल पाटील, सिद्धार्थ पाटील, संदीप पाटील, मनोहर घाडी, बापूसाहेब पाटील, यल्लाप्पा बिर्जे, मल्लाप्पा काकतीकर, विष्णू पाटील, शुभम जाधव, ज्ञानेश्वर पाटील, लक्ष्मण छत्राण्णावर, नारायण हुवाण्णावर, मनिषा घाडी, शालन पाटील, बाळकृष्ण पाटील, लक्ष्मण मेलगे, मनोहर सी. पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह

Spread the love  पथसंचलन, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला सोहळा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बेळगाव : देशभक्तीचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *