Sunday , June 21 2026
Breaking News

दहावीमध्ये राज्यात दुसरा आलेल्या झुंजवाड येथील दिव्या देसाईचा शिवस्वराज संघटनेतर्फे सत्कार

Spread the love

 

खानापूर : राज्यात दहावीच्या परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवणे ही खानापूर तालुक्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट असून दिव्या देसाई हिने पुढील शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत चांगली कामगिरी करावी असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष तसेच शिवस्वराज्य संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी केले आहे.
दहावी परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवलेल्या झुंजवाड येथील दिव्या देसाईचा शिवस्वराज संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला आहे. प्रारंभी संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी दिव्या देसाईचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच राज्यात दुसरा क्रमांक मिळवणे ही अतिशय अभिमानाची गोष्ट असून खानापूर तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवा परीक्षा देण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची माहिती किंवा मदत हवी असल्यास सुसरा संघटना सातत्याने मदतीचा हात पुढे करील असे मत व्यक्त केले. माजी ग्राम पंचायत सदस्य
आप्पाजी पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी संघटनेचे खजिनदार मुकुंद पाटील, गर्लगुंजी येथील माऊली क्रॉप सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील, मिलिंद देसाई, संदेश कोडचवाडकर, हेब्बाळ मराठी शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष मोहन गुरव, धामणे शाळेतील किडा शिक्षक एम.एम.पाटील.
प्रदिप देसाई, माजी ग्रामपंचायत अध्यक्षा दिपा देसाई आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कन्नड फलक सक्तीविरोधी मोर्चासाठी नंदगडमध्ये जनजागृती अभियान

Spread the love  नंदगड : कन्नड फलक सक्तीविरोधात २२ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *