Friday , August 28 2026
Breaking News

कंग्राळी (बी. के.) महालक्ष्मी यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बी. के. येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून ब्राह्ममुहूर्तावर देवीचा अक्षतारोपण सोहळा संपन्न झाला. देवीच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बी. के. गावामध्ये आज पहाटेपासूनच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पहाटे ५ वाजून ४८ मिनिटांनी पुजारी आणि पंचायत कमिटीच्या उपस्थितीत ब्राह्ममुहूर्तावर देवीचा अक्षतारोपण विधी पार पडला. या विवाह सोहळ्याला महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सर्वांना यात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यात्रेनिमित्त होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम शांततेत आणि सलोख्याने पार पाडावेत, असे आवाहन त्यांनी केले. उद्या होणाऱ्या रथोत्सवात सर्व भाविकांनी भक्तिभावाने सहभागी व्हावे आणि देवी सर्वांना सुख-समृद्धी देवो, अशी प्रार्थना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केली. यात्रोत्सवाच्या निमित्ताने युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांनीही ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या. आज पहाटे ५:४८ वाजता देवीचे अक्षतारोपण झाल्यानंतर मान्यवरांनी देवीचे पूजन केले. आज देवी मंदिरातच मुक्कामी असून उद्या सकाळी ९ वाजल्यापासून रथोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर देवीची मूर्ती नियोजित ठिकाणी गद्दीवर विराजमान होईल. उद्या रात्री हाल्याळ येथील वारकऱ्यांचे जागरण आणि इचलकरंजी येथील महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती यात्रोत्सव समितीने दिली आहे. या सोहळ्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

३१ ऑगस्ट रोजी चलवेनहट्टी येथे महाप्रसादाचा कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : चलवेनहट्टी येथे सालाबाद प्रमाणे यंदाही श्रावण महिन्यात महाप्रसादचे (परव) आयोजन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *