Friday , August 28 2026
Breaking News

करामधील सूट मिळण्यासाठी निपाणी नगरपालिकेत कर भरण्यासाठी गर्दी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : नवीन आर्थिक वर्षाला एक एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील नगरपालिकेध्ये मालमत्ता कर (घरफाळा) पाणी पट्टी ३० एप्रिल पर्यंत करा मध्ये ५ टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे कर भरण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. याशिवाय थकबाकी वसुलीची मोहीम राबवली जात आहे.
मालमत्ता कर वेळेत किंवा एकरकमी भरल्यास मिळणारी सवलत मिळविण्यासाठी दिवसभर नगरपालिकेत नागरिकांच्या रांगा लागत आहेत. यापूर्वी नगरपालिकेकडून नागरिकांना कर भरण्याचे आवाहन केले होते. तरीही त्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेकांची थकबाकी आहे.थकीत करदात्यांची मालमत्ता जप्त करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे आता जप्ती टाळण्यासाठी नागरिक कर भरण्यासाठी धावपळ करीत आहेत. मे ते जून महिन्यापर्यंत विना दंड कर भरून देण्यात येणार आहे. त्यानंतर जुलैपासून पाच टक्के दंड आकारून वसुली सुरू राहणार आहे. त्यामुळे भर उन्हातही नागरिक कर भरण्यासाठी नगरपालिकेच्या आवारात गर्दी करत आहेत. ही गर्दी टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने अधिकृत वेबसाईटवरून कर भरून घेण्याची मागणी नागरिकातून होत आहे. करदात्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत कर भरून दंडाची रक्कम वाचवावी, असे आवाहन महसूल निरीक्षक सुनील कांबळे यांनी केले आहे.
अद्याप एक महिना करातील सूट देऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी माजी नगरसेवक दिलीप पठाडे यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘रवळनाथ’च्या निपाणी शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त सेवानिवृत्त सभासद, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love  निपाणी (वार्ता) : गडहिंग्लज येथील श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी (मल्टी-स्टेट) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *